गुवाहाटी। भारत विरुद्ध विंडिज संघात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने आज जर 51 धावा केल्या तर तो भारताकडून खेळताना वनडेत 10 हजार धावा करणारा चौथाच क्रिकेटपटू ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड़ यांनी या पराक्रम केला आहे.
भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने 463 वनडे सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. तर धोनी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने भारताकडून वनडेत 325 सामन्यात 50.24 च्या सरासरीने 9949 धावा केल्या आहेत.
तसेच धोनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 328 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील 3 वनडे सामने हे आशियाई एकादश संघाकडून खेळला आहे. या तीन सामन्यात मिळून त्याने 174 धावा केल्या आहेत.
त्यामुळे याआधीच त्याने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण भारताकडून अजून त्याला हा टप्पा गाठण्यासाठी 51 धावांची गरज आहे.
भारताने विंडीज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-
18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)
11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)
10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)
9949 धावा – एमएस धोनी (325 सामने)
9779 धावा – विराट कोहली (212 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
–रिषभ पंतचे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण; पहिल्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडीया
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग ११- पृथ्वी शॉ नावाचा हिरा शोधणारा जवाहिरी..
–ISL 2018: जमशेदपूरमधील सामन्यात एटीकेची लागणार कसोटी