आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ दिल्ली कॅपिटल्सकडून पराभूत झाला. दिल्लीविरुद्ध आरसीबीला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. चालू हंगामातील आरसीबीचा हा पाचवा पराभव होता. विराटने या सामन्यात अर्धशतक करत आपल्या 7000 आयपीएल धावा पूर्ण केल्या. पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. विराट दीर्घकाळ कर्णधार राहिलेला आरसीबी संघ एकही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि एमएस धोनी (MS Dhoni) आतापर्यंतचे सर्वात यशस्वी कर्णधार राहिले आहेत. विराट कोहली भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार राहिला आहे. पण विराटच्या नेतृत्वात आणि विराटने नेतृत्व सोडल्यानंतर आरसीबीला एकही आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाहीये. धोनीने आपल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी चार आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे आरसीबी अजून पहिल्याच ट्रॉफीसाठी झगडत आहे. याच पार्श्वभूमीवर वसीम अक्रम (Wasim Akram) यांनी धोनी आणि विराटविषयी मोठा दावा केला आहे. वसीम अक्रमच्या मते धोनी आरसीबीचा कर्णधार असता, तर त्याने संघासाठी आतापर्यंत तीन ट्रॉफी जिंकल्या आहेत.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रम म्हणाले, “जर एमएस धोनी आरसीबीचा कर्णधार अशता, तर फ्रँचायझीने आतापर्यंत तीन आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असत्या. पण आरसीबीने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीये. आरसीबीला जबरदस्त समर्थनही मिळत आले आहे. सोबत त्यांच्याकडे सर्वोत्तम खेळाडूही आहेत, पण त्यांनी अजून एकही ट्रॉफी जिंकली नाहीये. धोनी त्यांचा कर्णधार असता, तर नक्कीच विजेतेपद पटकावण्यासाठी मदत झाली असती.” दरम्या, अक्रमच्या या
धोनीच्या कौतुकात अक्रम पुढे म्हणाले, “धोनीला कर्णधारपदाची सवय आहे. नेतृत्व करणे हीदेखील एक सवय असते. विराटलाही ही सवय असेल, पण धोनीला ही सवय आहेच. तो आतमधून शांत नसतो, शांत असल्यासारखे दाखवतो. जेव्हा खेळाडू आपल्या कर्णधाराला शांत पाहतात आणि तो जेव्हा खांद्यावर हात ठेवतो, तेव्हा त्यांचाही आत्मविश्वास वाढतो. धोनी आपल्या खेळाडूंमधील आत्मविश्वास जागा करतो.” दरम्यान, आरसीबी संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन वेळा उपविजेता राहिला आहे. विराट पहिल्या आयपीएल हंगामापासून आरसीबीचा भाग आहे. नंतर काही वर्षांनी तो संघाचा कर्णधार बनला आणि 2021 हंगामानंतर त्याने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. सध्या आरसीबीचे कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डू प्लेसिस करत आहे. (‘Dhoni just pretends to be calm…’, the Pakistan legend’s statement angered Virat Kohli’s fans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘देशासाठी फक्त 11 जणच खेळू शकतात…’, आयपीएलदरम्यान रवी शास्त्रींचे मोठे विधान
‘शतक ठोकण्याचा विचार डोक्यात होता, पण…’, सेंच्युरी हुकल्यानंतर गिलची रोखठोक प्रतिक्रिया; लगेच वाचा