जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नई चांगलाच घसरला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा देखील एकेरी धावसंख्येवर बाद झाला. त्याचबरोबर, तब्बल अकरा वर्षानंतर तो पावर-प्लेमध्ये बाद झाला.
धोनीच्या पदरी पुन्हा निराशा
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिला सामना खेळताना चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी अवघ्या तीन धावा काढून बाद झाला. तो सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ऍडम मिल्नेच्या गोलंदाजीवर ट्रेंट बोल्टच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
धोनी याबरोबरच आपल्या आयपीएल कारकिर्दीत केवळ दुसऱ्यांदा पावर-प्लेमध्ये बाद झाला. यापूर्वी तो आयपीएलच्या तिसर्या हंगामात म्हणजे २०१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरूद्ध पावर प्लेमध्ये बाद झालेला. त्यावेळी, डर्क नॅनेस याने त्याचा बळी मिळविला होता. त्यानंतर, तब्बल अकरा हंगामानंतर तो पावर-प्लेमध्ये बाद झाला.
चेन्नईची समाधानकारक धावसंख्या
पावर-प्लेमध्ये आघाडीचे चार फलंदाज केवळ २४ धावांमध्ये गमावले. त्यानंतर सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने एकहाती संघाचा डाव सावरला. त्यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत ८८ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. त्याला ड्वेन ब्रावो (२३) व रवींद्र जडेजा (२६) यांनी उपयुक्त खेळ्या करत संघाचा डाव १५६ पर्यंत नेला. मुंबईसाठी ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. १५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईने क्विंटन डी कॉकच्या रुपाने पहिला बळी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ipl-2021-csk-vs-mi-live-chennai-super-kings-20-overs-6-out-156-runs/
नया है यह! क्षेत्ररक्षकाने पकडला अफलातून झेल, पण संघसहकाऱ्याच्या चुकीमुळे अंपायरने दिला ‘सिक्स’