एमएस धोनी याने कर्णधाराच्या रुपात आपला शेवटचा सामना खेळला आहे. आगामी आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जला नवीन कर्णधार मिळाला आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) ऋतुराज गायकवाड याला सीएसकेचा नवीन कर्णधार म्हणून घोषित केले गेले. अशात चाहत्यांना धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने जिंकलेला शेवटचा सामना आठवत आहे.
मागच्याच वर्षी म्हणजे आयपीएल 2023मध्ये एमएस धोनी (MS Dhoni) याने कर्णधार म्हणून आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी उंचावली. याचही वेळा त्याने सीएसकेचा कर्णधार म्हणून आयपीएल किताव नावावर केला. पण आगामी आयपीएल हंगाम धोनीसाठी शेवटचा असू शकतो. याच पार्श्वभूमीवर संघात नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी त्याने सीएसकेचे कर्णधारपद सोडल्याचे दिसते. धोनीनंतऱ आता सीएसकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याच्या खांद्यावर आली आहे. गुरुवारी सीएसकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही पोस्ट शेअर केली गेली.
धोनी आगामी हंगामात ऋतुराजच्या नेतृत्वात खेळणार असला, तरी नवख्या कर्णधाराला त्याच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे. अशात मैदानात धोनीच्या हातात खूपकाही असणार आहे. कर्णधार म्हणून चाहते धोनीला पुन्हा कधी पाहू शकणार नाहीत. अशात कर्णधाराच्या रुपात त्याने खेळलेल्या शेवटच्या सामन्याचे काही क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मागच्या वर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यात धोनी सीएसकेचा कर्णधार होता. या सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सला मात दिली आणि पाचव्यांदा आयपीएल जिंकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
The final match of MS Dhoni as the captain of Chennai Super Kings.
– Thank you, Captain Thala. pic.twitter.com/UJTIqHJXmw
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2024
The best ending for the Leader of the generation.
– May 29th, 2023 will be remembered forever as Captain MS Dhoni day. pic.twitter.com/79hnNkYoTv
— Johns. (@CricCrazyJohns) March 21, 2024
आयपीएल 2023च्या या अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर सीएसके आणि गुजरातमधील लढत चुरशीची झाली होती. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 214 धावा केल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सीएसकेला 15 षटकात 171 धावांचे लक्ष्य पंचांनी दिले. डावाच्या शेवटच्या चेंडूवर रविंद्र जडेजा याने चौकार मारून 171 धावांचे लक्ष्य गाठले. सीएसकेने 5 विकेट्स राखून हा सामना जिंकला होता.
आगामी हंगामात सीएसकेला आपली 6वी आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी नव्या दमाचा कर्णधार प्रयत्न करणार आहे. ऋतुराजच्या नेतृत्वात संघाचे प्रदर्शन कसे राहते, हे पाहण्यासारखे असेल. (Dhoni played the last match as captain! Watch the emotional video of IPL 2023 final)
महत्वाच्या बातम्या –
चॅम्पियन्स युगाचा अंत! ना धोनी.. ना रोहित.. ना विराट, युवा खेळाडू बनले आयपीएल संघांचे कॅप्टन
पहिल्याच सामन्यात ऋतुराज समोर RCB चे कडवे आव्हान; पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11