भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल की निवृत्तीची घोषणा करेल, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्याबद्दल अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व मते मांडली आहेत.
अखेर बुधवारी धोनीनेच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. एका कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला, ‘जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका.’
धोनी 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या क्रिकेटमधील भविष्याबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
धोनी काही दिवसांपूर्वी झारखंडच्या 23 वर्षाखालील संघाबरोबर सराव करताना दिसला होता. त्यानंतर त्याच्या पुनरागमनाविषयी चर्चा सुरू होती.
तसेच काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही म्हटले होते की, धोनीला त्याच्यासारख्या दिग्गज अनुभवी खेळाडूला जो आदर मिळायला पाहिजे तोच आदर मिळेल.
त्याचबरोबर धोनी 2021 पर्यंत आयपीएलमध्ये खेळेल असे नुकतेच एका सुत्राने सांगितले होते. त्यामुळे आता धोनी त्याच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेणार हे पहावे लागेल. असे असले तरी धोनीने जानेवारी 2020पर्यंत तरी क्रिकेट खेळताना दिसणार नसल्याचे त्याच्या उत्तरावरुन स्पष्ट झाले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी20 विश्वचषक 2007 आणि वनडे विश्वचषक 2011 जिंकला आहे.
तसेच धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी सामने, 350 वनडे सामने आणि 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही प्रकारात मिळून त्याने 17000 पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत.
संघाबरोबर बसने न जाता ३ किलोमीटर पळत हॉटेलवर परतला स्टिव्ह स्मिथ, जाणून घ्या कारण
वाचा👉https://t.co/n9bxauTW0R👈#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #AUSvPAK #SteveSmith— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019
या कारणांमुळे ख्रिस गेल टीम इंडीया विरुद्ध खेळणार नाही वनडे मालिका
वाचा- 👉https://t.co/ptDVqESQxa👈#म #मराठी #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #chrisgayle— Maha Sports (@Maha_Sports) November 27, 2019