नुकतेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-1 अशा फरकाने पराभूत झाला. या मालिकेत भारताची मधल्या फळीतील फलंदाजी या मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरली. मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशाचे खापर एमएस धोनीवर फोडले.
या मालिकेनंतर एमएस धोनीवर मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. आता यामध्ये भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरचीही भर पडली आहे.
माजी कर्णधार एमएस धोनीवर गंभीरने कठोर शब्दात टिका केली आहे.
“धोनी खूप निर्धाव चेंडू खेळत आहे. त्यामुळे बाकिच्या फलंदाजांवर दबाव येत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील भारताच्या पराभवला अदिल रशिद आणि मोइन अली यांच्याबरोबर धोनीनेही हातभार लावला आहे. मी एमएसला इतकी वाईट फलंदाजी करताना कधीही पाहिले नाही.” अशा शब्दात गंभीरने धोनीवर टिका केली.
या मालिकेतील लॉर्ड्स येथील दुसऱ्या सामन्यात धोनी ५९ चेंडूत ३७ धावांची संथ खेळी खेळला होत्या. त्यावेळी धोनीच्या या संथ खेळीची मैदानावरील प्रेक्षकांनी टिका करत खिल्ली उडवली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–‘त्या’ सेलिब्रेशनचा जो रुटला झाला पश्चाताप!
–कसोटी संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्माचे भावुक ट्विट
–बीसीसीआयच्या वेबसाइटवर एमएस धोनीच आहे टीम इंडियाच्या कर्णधारपदी कायम!