भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, धोनी जाहिरातींमध्येही खूप दिसतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आयपीएल २०२१ च्या जाहिरातीत धोनीची पूर्णपणे वेगळी शैली पाहायला मिळाली होती. यामुळेच धोनीच्या अनेक चाहत्यांनी त्याला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्लाही दिला आहे. पण त्याचा आपल्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल काय विचार आहे? याचा खुलासा नुकताच धोनीने केला आहे.
काही वर्षांपूर्वी धोनीचा बायोपिक बनवण्यात आला होता, ज्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याची भूमिका साकारली होती. धोनीने त्याच्या बायोपिकमध्ये स्वतःचे पात्र साकारावे, अशी मागणी त्यावेळी अनेक लोक करत होते. पण क्रिकेटपटूला स्वत:ला जास्त वेळ कॅमेऱ्यासमोर ठेवणे खूप कठीण असते, जे धोनीलाही वाटते.
एका वृत्तानुसार, ‘धोनी म्हणतो की तो निवृत्तीनंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याचा विचारही करत नाही. कारण त्याला वाटते की अभिनय करणे इतके सोपे काम नाही.’
माध्यमांतील वृत्तांनुसार धोनी म्हणाला की, ‘तुम्हाला माहित आहे की अभिनय हा माझा प्रांत नाही. जोपर्यंत जाहिरातींचा संबंध आहे, मी ते करण्यात खूप आनंदी आहे. जेव्हा चित्रपटांचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की, हा एक अतिशय कठीण व्यवसाय आहे आणि त्यास हाताळणे खूप कठीण आहे. मी ते काम चित्रपट कलाकारांवर सोपवतो, कारण ते खरोखरच चांगले काम करत असतात. मी क्रिकेटशी जोडलेला राहील. मी फक्त जाहिरातींद्वारे अभिनयच्या जवळ येऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त नाही.’
खूप कमी लोकांना माहित आहे की, धोनीने बॉलिवूड चित्रपटात कॅमिओ केला होता, पण त्याचा चित्रपट कधीच प्रदर्शित झालाच नाही. डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘हुक या क्रूक’ असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि श्रेयस तळपदे सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे शूटिंग २०१० मध्ये सुरू झाले होते. या चित्रपटाची कथा एका मुलाची होती, ज्याचे स्वप्न असते की भारतीय क्रिकेट संघात जावे. पण दुर्दैवाने तो तुरुंगात पोहचतो. या चित्रपटात धोनीने कॅमिओ केला होता, पण काही कारणामुळे शूटिंग नंतर पूर्ण होऊ शकले नाही आणि चित्रपटही प्रदर्शित झाला नाही.
अलीकडे, हरभजन सिंग आणि इरफान पठाणसारख्या क्रिकेटपटूंनी निवृत्तीनंतर चित्रपटात पदार्पण केले आहे. हरभजन सिंगचा चित्रपट फ्रेंडशिप गेल्या महिन्यात रिलीज झाला आहे. त्याचबरोबर इरफान पठाण ‘कोब्रा’ चित्रपटात दिसला. या दोन खेळाडूंच्या आधी विनोद कांबळी, अजय जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली हे देखील चित्रपटांमध्ये झळकले आहेत. अशा परिस्थितीत धोनीचे चाहतेही त्याला सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आऊट ऑफ फॉर्म’ इशानचे राजस्थानविरुद्ध ‘रॉयल’ कमबॅक, प्रेयसीचे टीकाकारांना तिखट प्रत्युत्तर
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘व्हायरल गर्ल’, तमन्ना ते काव्यासारख्या सौंदर्यवतींचा समावेश
टी२० विश्वचषक तोंडावर, पण त्याआधीचे सराव सामनेही महत्त्वाचे, वेळापत्रक झालंय घोषित; टाका नजर