मोहाली। येथे सुरु असलेल्या भारतविरुद्ध श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीने आज श्रीलंका कर्णधार थिसेरापरेराचा अद्भुत झेल घेतला.
सामन्याचे षटक फिरकीपटू युजवेंद्र चहल टाकत होता. त्याच्या या षटकात शेवटच्या चेंडूवर त्याने रेराला धोनीकरवी झेलबाद केले. हा चेंडू परेराच्या ग्लोजला लागून उंच उडाला. त्याच वेळी धोनीने झेल घेतला.
https://twitter.com/Maha_Sports/status/940929038423547904
या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर ३९२ धावा केल्या आहेत आणि श्रीलंकेला ३९३ धावांचे आव्हान दिले आहे. सध्या श्रीलंकेने ७ बाद १८९ धावा केल्या आहेत. श्रीलंकेकडून सध्या अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज खेळपट्टीवर नाबाद ७२ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. त्याच्याबरोबर अकिला धनंजया खेळत आहे.