इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये सोमवारी (४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजयी धावा घेत सामना जिंकला. कमी धावसंख्या असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चांगला खेळ केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
या सामन्यानंतर सीएसके कर्णधार एमएस धोनीने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सोबत चर्चा करताना दिसला. सीएसकेने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि यास गमतीदार कॅप्शन देत म्हटले आहे की, ‘धोनीकडून अजून एक मास्टरक्लास.’ दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आणि सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. या व्यतिरिक्त सीएसकेचे सुरेश रैना आणि मोईन अली देखील आहेत.
7️⃣1⃣7️⃣
Latest addition to the Master class diaries! #DCvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/6JVSMOJbzt
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 5, 2021
सीएसके विरुद्धचा हा सामना रिषभ पंतसाठी खूप खास होता. कारण सोमवारी पंत आपला २४ वा वाढदिवस साजरा करत होता. दिल्ली संघाने आपल्या कर्णधारला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सामना जिंकून खास भेट दिली आहे. याआधी हा दुर्मिळ योग सचिन तेंडुलकरच्या बाबतीत २०११ साली झाला होता.
तत्पूर्वी, सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करताना केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५५ धावा झळकावल्या. त्याला धोनीने १८ धावांची साथ दिली. तर उथाप्पाने देखील १९ धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने २ तर आवेश खान, एन्रीच नॉर्किए आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. सर्वच गोलंदाजांनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला १३६ धावांवर रोखलं.
चेन्नईने दिल्लीसमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या ३९ धावा आणि शिमरॉन हेटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद २८ धावांच्या जोरावर दिल्लीने सामन्यावर पकड ठेवली. शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत दिल्लीला ३ गड्यांनी सामना जिंकून दिला.
दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट कसोटीपटू! ‘सुपरस्लो’ खेळीनंतर सोशल मीडियावर उठला बाजार
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराला येतेय भारतीय मसाल्यांची आठवण; म्हणाली, ‘मला शक्य तितक्या लवकर…’