---Advertisement---

धोनी बनला रणवीर सिंग! रांचीतील फार्म हाऊसवर दिसला कॅप्टन कूलचा अंतरंगी कूल, तुम्हीही पाहा

MS Dhoni
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023 हंगाम जिंकल्यानंतर पुन्हा रांचीमध्ये दाखल झाल्याचे दिसते. इंडियन प्रीमियर लीग 2023च्या अंतिम सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव करून ट्रॉफी नावावर केली. आयपीएल इतिहासात सीएसकेला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकवून दिल्यानंतर धोनीचा एक पोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. चाहते या फोटोवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

एमएस धोनी () सोशल मीडियावर खूपच कमी संक्रिय असतो. पण त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ मात्र, मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अगदी साधे राहणीमान असणाऱ्या धोनीचा व्हायरल होत असलेला पोटो आणि रणवीर सिंग यांची तुलाना होताना दिसत आहे. फोटोत धोनी अगदीच रंगीत नाईट सुटमध्ये दिसत आहे. धोनीचा हा अतरंगी लूक पाहून चाहत्यांना थेट रणवीर सिंग आठवला आहे, जो नेहमीच अशा प्रकारचे रंगीत पकडे घालत असतो. असे असले तरी, चाहत्यांकडून धोनीच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

व्हायरल होत असलेल्या धोनीच्या फोटेत त्याची दाढी पूर्ण पांढरी झाल्याचेही दिसत आहे. ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा धोनी पांढऱ्या दाढीसह कॅमेऱ्यासमोर आला आहे. लाईव्ह सामन्यातही अनेकदा त्याची पांढरी दाढी पाहायला मिळाली आहे. धोनीचे वय सध्या 41 वर्षांचा असला, तरी मैदानात त्याच्यामुळे संघाच्या प्रदर्शनात कधीच फरक पडत नाही. आजही धोनी एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल अशा पद्धतीने सामन्याचा शेवट करू शकतो. खेळपट्टीवर धावाना त्याची गती पाहण्यासारखी असते.

दरम्यान, आयपीएल 2023 हंगाम सुरू होण्याआधीपासून धोनी यावर्षी आयपीमधून निवृत्त होणार, अशा चर्चा होत्या. मात्र, धोनीने हा निर्णय घेण्याची कुठलीच घाई केली नाहीये. धोनी आयपीएल 2024 मध्येही सीएसकेचे नेतृत्व करताना दिसू शकतो. (Dhoni was spotted at a farm house in Ranchi dressed like Ranveer Singh)

महत्वाच्या बातम्या –
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
बांगलादेशने उद्ध्वस्त केले कसोटी क्रिकेटचे रेकॉर्ड, अफगाणिस्तावर मिळवला 500हून अधिक धावांनी दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---