भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (24 सप्टेंबर) रणजी ट्रॉफी विजेत्या मुंबईविरुद्धच्या इराणी चषक सामन्यासाठी शेष भारतीय संघाची घोषणा केली आहे. या 15 सदस्यीय संघात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज यश दयाल यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही खेळाडू बांगलादेशविरुद्ध कानपूर येथे 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग आहेत. अशा स्थितीत ध्रुव आणि यश या दोघांना कानपूर कसोटीसाठी बाकावर बसवली जाण्याची दाट शक्यता आहे.
लखनऊच्या अटल विहारी वाजपेयी स्टेडियमवर 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान शेष भारत संघ आणि मुंबई यांच्यात इराणी चषक सामना खेळवला जाणार आहे. चेन्नईतील पहिली कसोटी संपल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारताच्या 16 सदस्यीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. यावेळी बीसीसीआयने असेही म्हटले आहे की, जर सरफराज खानला दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये समाविष्ट केले नाही तर त्याला रिलीज केले जाईल. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली इराणी चषकाच्या सामन्यात सफराज मुंबईकडून खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सरफराजप्रमाणेच जुरेल आणि यशला कानपूर कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही तर त्यांना इराणी चषकासाठी सोडले जाईल.
जुरेल-दयालची उपलब्धता प्लेइंग-11 वर अवलंबून आहे
बीसीसीआयने सांगितले की, जुरेल आणि दयाल यांचा शेष भारत संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु त्यांची उपलब्धता बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यावर अवलंबून असेल. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 1 ऑक्टोबरला हा सामना संपेल.
इराणी चषकासाठी शेष भारत संघ पुढीलप्रमाणे आहे…
रुतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर.
हेही वाचा-
वेड्या बहिणीची वेडी ही माया! खास पोस्ट शेअर करत साराच्या अर्जुनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी