भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी अनुक्रमे नाबाद 24 आणि 16 धावा करुन नाबाद परतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 152 धावांची गरज आहे.
त्याआधी तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ध्रुव जुरेल याच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 307 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडिया इंग्लंडने केलेल्या 352 धावांचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडची आर अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांच्या फिरकीसमोर काहीच चाललं नाही. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला 192 धावांचं आव्हान मिळालं आहे.
याबरोबरच, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या विकेट्सची घसरण सुरू असताना ध्रुव जुरेलने शानदार अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर लष्करी शैलीत सलामी देत सेलिब्रेशन केले आहे. शेवटच्या परीक्षेत पदार्पण करणाऱ्या जुरेलचे सेलिब्रेशन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. तसेच जुरेल त्याच्या शतकापासून फक्त 10 धावा दूर राहिला असला तरी त्याने ही खेळी आपल्या वडिलांना समर्पित केली आहे. तर जुरेलचे वडील निवृत्त लष्करी जवान आहेत, त्यांनी कारगिल युद्धातही योगदान दिले होते. आपल्या मुलाने एनडीएची परीक्षा द्यावी आणि लष्करात अधिकारी होऊन देशाची सेवा करावी, अशी जुरेलच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच सर्फराजने अर्धशतकानंतर सलामी देत सेलिब्रेशन केले आहे.
दरम्यान, ध्रुव जुरेलच्या या खेळीवर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर जाम खूष झाले. त्यांनी जुरेलची तुलना एमएस धोनीशी करत मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच म्हणाले की, जुरेलचा प्रेजेंस ऑफ माईंड पाहून मला वाटतं की तो पुढचा महेंद्रसिंह धोनी आहे. ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगमध्ये देखील आपले चुणूक दाखवून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- IND vs ENG : तिसऱ्या दिवसअखेर भारत मजबूत स्थितीत, चौथ्या दिवशी सामना जिंकण्यासाठी 152 धावांची गरज
- IND vs ENG : रांची कसोटीत मोठी उलथापालथ! आर अश्विनचा ‘पंजा’, भारताला विजयासाठी 192 धावांचे लक्ष