भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रमेश पोवार यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी कायम ठेवावे असे सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडलजी म्हणाल्या आहेत.
याबाबत एडलजी यांनी सीओएचे अध्यक्ष विनोद राय यांना इमेल केला आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्म्रिती मानधना या दोघींनी म्हटलेल्या गोष्टींचाही विचार करावा असेही एडलजी यांनी सुचविले आहे. मात्र राय यांनी यास साफ नकार दिला आहे. कारण बीसीसीआयने प्रशिक्षकपदाचे अर्जही स्विकारले आहेत.
महिला प्रशिक्षकपदाचे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर आहे. आतापर्यंत मनोज प्रभाकर, हर्शेल गिब्ज आणि दिमित्री मस्कारेन्हाज यांचे अर्ज आले आहेत.
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे अर्जदारांच्या मुलाखती घेऊन प्रशिक्षक निवडणार आहेत.
“एडलजी यांनी इमेल करून कौर आणि मानधना या दोघीच्या मताचा विचार करून पोवार यांना न्यूझीलंड दौऱ्यासाठी परत संघाचे प्रशिक्षक बनवावे”, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
24 जानेवारी 2019पासून न्यूझीलंडच्या दौऱ्याला सुरूवात होणार असल्याने बीसीसीआयला या दौऱ्याआधी संघाचा प्रशिक्षक नेमायचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वन-डे आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.
मिताली राजला पार पडलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यात 11 जणींच्या भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे अनेकांनी संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले होते.
याचबरोबर राजने बीसीसीआयला पत्र लिहून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि सर्वोच्च न्यायालयाने नेमून दिलेली समिती (सीओए) सदस्य डायना एडलजी यांच्यावर अपमानास्पद वागणूकीचा आणि भेदभाव करण्याचा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–अॅडलेड कसोटी विजयामुळे टीम इंडियाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग
–दुखापतीनंतर हार्दिक पंड्या या संघाकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज
–ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या स्पर्धेत नाणेफेकी ऐवजी या अनोख्या पद्धतीचा होणार अवलंब