इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम आता अंतिम टप्प्याच्या जवळ पोहोचला आहे. साखळी फेरीतील केवळ एक सामना उरला आहे, तर प्ले ऑफमधील ३ संघांचे स्थानदेखील पक्के झाले आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हेच ते तीन संघ आहेत. त्यामुळे आता साखळी फेरी सामन्यांनंतर उपांत्य फेरी सामने होतील. त्यानंतर शेवटी अंतिम सामना होईल, असे सर्वांना वाटत असेल.
कारण सहसा क्रिकेटच्या कोणत्याही टूर्नामेंटमध्ये सामन्यांचे स्वरुप अशाच प्रकारचे असते. पण आयपीएलचे नियम थोडे वेगळे आहेत. आयपीएलमध्ये उपांत्य फेरी सामना नव्हे, तर प्ले ऑफ सामने खेळले जातात. चला तर समजून घेऊया, प्ले ऑफ सामन्यांचे स्वरुप.
केव्हा झाली प्ले ऑफची सुरुवात?
२००८ साली आयपीएलचा श्रीगणेशा झाला. त्यावेळी क्रिकेटच्या इतर स्पर्धांसारखे साखळी फेरी सामन्यानंतर उपांत्य फेरी आणि शेवटी अंतिम सामना खेळवला जात असायचा. साखळी फेरी सामन्यांअखेर गुणतालिकेत टॉप-४ क्रमांकावरील संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचायचे. त्यानंतर विजेत्या २ संघांमध्ये अंतिम सामना व्हायचा. परंतु न्यूझीलंडमधील रग्बी लीग आणि ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल लीगमधील प्ले ऑफची लोकप्रियता बीसीसीआयला भोवली. त्यामुळे बीसीसीआयने २०११ साली पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्ले ऑफची सुरुवात केली.
प्ले ऑफ उपांत्य फेरीपेक्षा कसा वेगळा?
उपांत्य फेरीमध्ये गुणतालिकेतील टॉप-४ संघांना प्रवेश मिळतो. पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये पहिला उपांत्य फेरी सामना होतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघात दुसरा उपांत्य फेरी सामना होतो. त्यातील विजेते दोन संघ अंतिम सामना खेळतात. मात्र प्ले ऑफमध्ये पहिला क्वालिफायर, इलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर असे तीन सामने होतात. त्यानंतर अंतिम सामना खेळला जातो.
कसे होतात प्ले ऑफचे सामने?
पहिला क्वालिफायर सामना – पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुणतालिकेतील टॉप-२ संघ आमनेसामने येतात. या सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करतो. तर पराभूत संघाला दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा नशीब आजमावण्याची संधी मिळते.
इलिमिनेटर सामना – गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांमध्ये इलिमिनेटर सामना होता. यात पराभुत झालेला संघ हंगामातुन बाहेर पडतो. तर विजेता संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचतो.
दुसरा क्वालिफायर सामना – दूसऱ्या क्वालिफायर सामन्यात विजेता इलिमिनेटर आणि पहिला पराभुत क्वालिफायर संघ खेळतात. त्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतो.
अंतिम सामना – अंतिम सामन्यात पहिला क्वालिफायर विजेता आणि दुसरा क्वालिफायर विजेता संघ एकमेकांसमोर येतात.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत
…म्हणून सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झाली नाही निवड, भारतीय संघाच्या प्रशिक्षकाचा खुलासा
विरेंद्र सेहवागची ‘ती’ शतकी खेळी कोणताही क्रिकेट चाहता विसरू शकत नाही!
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?