भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळली जाणार आहे. ही दिवस-रात्र कसोटी असेल, जी गुलाबी चेंडूनं खेळली जाईल. पर्थमध्ये मालिकेतील पहिली कसोटी लाल चेंडूनं खेळण्यात आली होती. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, कसोटीच्या लाल चेंडू आणि गुलाबी चेंडू यांच्यात फरक काय असतो? गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा कसा वेगळा असतो? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
गुलाबी चेंडूचा वापर दिवस-रात्र कसोटीत केला जातो. रात्रीच्या वेळी लाईट्सखाली गुलाबी चेंडू लाल चेंडूपेक्षा जास्त चांगला पाहिला जाऊ शकतो. लाल चेंडू पांढऱ्या धाग्यानं शिवलेला असतो. तर गुलाबी चेंडू काळ्या धाग्यानं शिवलेला असतो. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडूला विशेष आवरण असतं. या आवरणाला ‘पॉलीयुरेथेन कोटिंग’ म्हणतात. याच्या मदतीनं चेंडू जास्त काळ चमकदार ठेवता येतो. जितकी चमक जास्त असेल, तितका चेंडू स्विंग होईल. गुलाबी चेंडू 40 षटकं सहज स्विंग करता येतो. कधीकधी चेंडू 40 षटकांनंतरही स्विंग होतो. मग जुन्या चेंडूकडून रिव्हर्स स्विंगही अपेक्षित आहे.
या चांगल्या गोष्टींव्यतिरिक्त, गुलाबी चेंडूच्या काही समस्या देखील आहेत. ज्या खेळाडूंना रंग दृष्टीची समस्या आहे, त्यांच्यासाठी या चेंडूची लाईन आणि लेन्थ ठरवणं सोपं नाही.
ऑस्ट्रेलियन विकेटकीपर बॅट्समन ॲलेक्स कॅरी गुलाबी चेंडूबद्दल बोलताना म्हणाला होता की, या बॉलनं खेळण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बॉल पाहावा लागेल. याशिवाय, तो म्हणाला की, या चेंडूला सोबत ठेवणं देखील खूप वेगळं आहे, याचं कारण म्हणजे या चेंडूला जास्त चमक असते.
हेही वाचा –
विराट कोहली नाही तर हा खेळाडू बनू शकतो आरसीबीचा नवा कर्णधार!
भरकटलेल्या पृथ्वी शॉला दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा, केविन पीटरसन म्हणाला…
दे चौका, दे छक्का! नेपाळ प्रीमियर लीगमध्ये शिखर धवनचा धुमधडाका