पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (26 जुलै) पार पडला. पॅरिसमध्ये 100 वर्षांनंतर ऑलिम्पिकचं आयोजन केलं जात आहे. मात्र बातमीनुसार, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वृत्तानुसार, अन्नाची कमतरता आणि वाहतुकीत अडचण यामुळे खेळाडूंच्या अडचणी वाढल्या आहेत. पॅरिस क्रीडाग्रामातून अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहेत.
‘जनसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारताची युवा बॅडमिंटनपटू तनिषा क्रास्टोला जेवण मिळू शकलं नाही. तिनं सांगितलं की 25 जुलै रोजी जेव्हा ती तिथे जेवणासाठी पोहोचली, तेव्हा तिला कळलं की मेनूमध्ये राजमा आहे. पण ती तिथे पोहोचेपर्यंत जेवण संपलं होतं. खेलग्राममध्ये खाण्यासाठी पाच वेगवेगळे हॉल बांधण्यात आले असून त्यात आशियाई, फ्रेंच आणि हलाल खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
तनिषा क्रास्टो हिला प्रवासातही अडचणी येत आहेत. तिनं सांगितलं की, ऑलिम्पिक व्हिलेजमधून स्टेडियमपर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणी येत आहेत. तनिषाच्या म्हणण्यानुसार, खेळाडूंसाठी व्यवस्था केलेली वाहनं वेळापत्रकानुसार धावत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना खूप त्रास सहन करावा लागत आहे. ती म्हणाला की, सामन्याच्या दिवशी तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधून स्टेडियमसाठी खूप आधी निघावं लागेल, जेणेकरून तो वेळेवर पोहोचू शकेल. तिनं रेल्वेच्या वेळापत्रकावरही मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
याशिवाय भारतीय बॉक्सर अमित पंघललाही खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अमित पंघाल आपल्या आहारात फक्त डाळ आणि रोटी घेतो. मात्र हे अन्न ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे पंघल याला बाहेरून अन्न मागवावं लागलं. भारताचे शेफ डी मिशन गगन नारंग यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी नोंदवलेल्या तक्रारीनं हा मुद्दा पुढे नेला आहे.
हेही वाचा –
पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या 5 खेळांमध्ये भारताचं पदक निश्चित! तिघांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा
पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन! 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्टेडियममध्ये होणार नाही उद्घाटन सोहळा