---Advertisement---

‘हा एक हृदयद्रावक शेवट’, आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभूत झाल्यानंतर रिषभ झाला भावूक

---Advertisement---

आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पराभवासह दिल्ली कॅपिटल्सचा प्रवास संपुष्टात आला आहे. अशा चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्यात दिल्लीच्या संघाने शेवटच्या दोन षटकांत जोरदार पुनरागमन केले होते. पण राहुल त्रिपाठीने शेवटच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर षटकार मारून केकेआर संघाला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे कर्णधार रिषभ पंतचे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला पहिल्यांदाच जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्नही भंगले आहे. त्यानंतर त्याने आपल्या ट्विटर हँडलवरून एक भावनिक पोस्ट देखील शेअर केली आहे. सामन्यानंतरही पंत खूप भावूक झाला होता.

पंतने आपल्या ट्विटरवर लिहिले, ‘हा एक हृदयद्रावक असा शेवट होता. पण असामान्य खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाचे नेतृत्व करण्यापेक्षा माझ्यासाठी अभिमानास्पद असे काहीही असू शकत नाही. आम्ही संपूर्ण हंगामात चांगला खेळ दाखवला आणि काही सामन्यात आमची कामगिरी थोडी कमकुवत होती. पण आम्ही आमचे १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न केला होता.’

रिषभ पंत प्रथमच दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. या मोसमात पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली होती आणि त्यांनी गुणतालिकेत अव्वल राहत अगदी दिमाखात संघाने प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले होते.

पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये दिल्ली संघाला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये केकेआरचा सामना करावा लागला. केकेआरविरुद्ध दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आणि एकाही फलंदाजाला या महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतक करता आले नाही. दिल्लीचा संघ केकेआरला या सामन्यात फक्त १३६ धावांचे आव्हान देऊ शकला.

https://twitter.com/RishabhPant17/status/1448599889764487173?s=20

यानंतर, कोलकाताच्या फलंदाजांसमोर दिल्लीने सुरुवातीला चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शनही केले नाही. सुरुवातीच्या षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीने आक्रमकता दाखवली नाही. दिल्ली संघाला पहिल्या विकेटसाठी तब्बल १३ व्या षटकापर्यंत थांबावे लागली होते. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या षटकात दोन गडी बाद करून सामना रोमहर्षक बनवला होता, पण राहुल त्रिपाठीने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून केकेआरला अंतिम फेरीत पोहोचवण्यात यश मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार

टीम इंडियाला मिळणार राशिद खानसारखा अव्वल फिरकीपटू? सचिनने शोधलाय नवा हिरा!

खडतर प्रवासानंतर कोलकात्याची फायनलमध्ये धडक, पण चेन्नईची ‘ही’ आकडेवारी घाम फोडणारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---