भारतीय हॉकी क्षेत्रात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहू लागलेत. भारताचे माजी कर्णधार दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहेत. तब्बल 15 वर्ष आंतरराष्ट्रीय हॉकी खेळणाऱ्या तिर्की यांची बिनविरोध निवड केली गेली. त्यांच्या विरोधातील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तिर्की सध्या ओडिशा हॉकी प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष असून, याआधी ते राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत.
Thanks @DrSYQuraishi & @FIH_Hockey for conducting smooth elections of @TheHockeyIndia. I will ensure that Indian hockey reaches to new heights.@CMO_Odisha @Media_SAI @IndiaSports pic.twitter.com/romj3xJQwR
— Dilip Kumar Tirkey (@DilipTirkey) September 23, 2022
या निवडणुकीसाठी तिर्की यांनी 18 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या आधी सामना उत्तर प्रदेश हॉकीचे अध्यक्ष राकेश कात्याल आणि झारखंड हॉकीचे अध्यक्ष भोलानाथ सिंह यांनी देखील उमेदवारी दाखल केलेली. भोलानाथ हे राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहेत. मात्र, तिर्की यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. तसेच, राकेश कात्याल यांनीदेखील अखेरचा क्षणी तिर्की यांना पाठिंबा दिला. तिर्की यांच्याशिवाय भोलानाथ सिंह यांची सरचिटणीसपदी निवड झाली. जम्मू आणि काश्मीर हॉकीच्या असिमा अली यांची महिला उपाध्यक्षपदी तर, हॉकी कर्नाटकच्या एस व्ही एस सुब्रमण्यम यांची पुरुष उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर दिलीप तिर्की यांनी यावरून आभार व्यक्त केले. त्यांनी लिहिले, ‘निरपेक्ष निवडणुकीसाठी हॉकी इंडिया आणि निवडणूक अधिकारी यांचे धन्यवाद. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू.’
दिलीप तिर्की हे भारतीय हॉकीमधील सर्वात अनुभवी हॉकीपटू मानले जातात. आपल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी भारतासाठी सर्वाधिक 412 सामने खेळले होते. यातील काही काळ त्यांनी संघाचे नेतृत्व केले. फुल बॅक स्थानावर खेळणाऱ्या तिर्की यांना पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट आणि उत्कृष्ट बचावासाठी ओळखले जात. तिर्की यांचे दोन भाऊदेखील भारतीय रेल्वेसाठी हॉकी खेळले आहेत. निवृत्तीनंतर तिर्की यांना बिजू जनता दलाने राज्यसभेवर पाठवले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितची रिप्लेसमेंट तयार! रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फलंदाजाने ठोकले नाबाद द्विशतक
दिल्ली-मुंबई जडेजाला आपल्या संघात घेण्यास उत्सुक; सीएसकेने दिले हे उत्तर