भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवत इतिहासात नाव कोरण्याची संधी होती. परंतु ही संधी भारतीय संघाने गमावली आहे. इतकी मोठी संधी गमावली असताना देखील इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. यावरुन माजी निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या ४ ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ १४ जुलैला एकत्र येणार आहे. या कार्यक्रमावरून माजी भारतीय निवडकर्ते आणि कर्णधार वेंगसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.(Dilip vengsarkar statement on Indian team 20 days break)
वेंगसरकर यांच्या मते भारतीय संघाने दोन वर्षे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात त्यांची तशी तयारी दिसून आली नाही. ते म्हणाले, “मी क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद घेतला. भारतीय संघाच्या सरावात कमतरता जाणवली. त्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. इतक्या महत्वाच्या सामन्यापूर्वी त्यांनी एकही सराव सामना खेळला नाही. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघ फिट होता. त्यांनी दोन कसोटी सामने खेळले होते.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मला नाही माहित असा कार्यक्रम कसा काय निश्चित केला गेला, जिथे मध्येच विश्रांती मिळेल आणि नंतर पुन्हा येऊन सामने खेळणार. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एक आठवड्याची विश्रांती पुरेशी होती. तुम्हाला सतत क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. मला तर आश्चर्य होत आहे. या कार्यक्रमाला होकार तरी कसा काय मिळाला?”
असा आहे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, रुध्दीमान साहा
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला, केएस भारत
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला
कडक! फलंदाजाने षटकार खेचण्यासाठी फिरवली बॅट अन् चेंडूने उडवली थेट दांडी