पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या सहाव्या दिवशी दिलीप खांडवी आणि विशाल यांनी संरक्षणात बजावलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर ओडिशा जुगरनट्स संघाने गुजरात जायंट्स संघाचा केवळ 3गुणांनी निसटता पराभव करताना तिसऱ्या विजयाची नोंद केली. गुजरात जायंट्स संघाचा हा पहिलाच पराभव ठरला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिलीप खांडवीने 4मिनिटे 30सेकंद आणि विशाल याने 3मिनिटे 4सेकंद संरक्षण करून अत्यंत रोमांचकारी ठरलेल्या या लढतीत ओडिशा संघाला 50-47 असा चित्तथरारक विजय मिळवून दिला. ओडिशा संघाकडून वझीर सुभाषिश संत्रा याने आक्रमणात 10 गुणांची तर, मिलिंद चावरेकरने 7 गुणांची नोंद करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
गुजरात जायंट्स संघाकडून अनिकेत पोटे आणि सुयश गरगटे यांनी अनुक्रमे 8 आणि 9 गुणांची नोंद करताना कडवी झुंज दिली. तसेच, गुजरातचा अष्टपैलू खेळाडू अभिनंदन पाटील याने आक्रमणात 6 गुणांची नोंद करताना लीग मधील सर्वाधिक गुण मिळवणारा वझीर या शर्यतीत मुंबई खिलाडीज संघाचा दुर्वेश साळुंखे(30गुण)याला मागे टाकले. अभिनंदनच्या नावावर आता 35 गुणांची नोंद आहे.
त्याआधी ओडिशा संघाने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. दुसऱ्या तुकडीत मैदानावर उतरलेल्या विशालने 3मिनिटापेक्षा अधिक संरक्षण करताना आपल्या संघाला 4बोनस गुण मिळवून दिले. वझीर अक्षय भंगारे याने त्याला बाद करताना पहिल्या सात मिनिटाअखेर गुजरातला 22-04 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र राजस्थानवरील विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या ओडिशाने दुसऱ्या सत्रात 24 गुण मिळवताना पहिल्या डावा अखेर 28-24 अशी आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावाच्या प्रारंभी दिलीप याने 3मिनिटे 32 सेकंद संरक्षण करताना ओडिशा संघाला 6 बोनस गुण मिळवून दिल्यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली. या सत्रात त्याच्या भक्कम संरक्षणामुळे गुजरातला केवळ 19 गुण मिळवता आले. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ 43-34 अशी 9 गुणांचीच आघाडी राहिली.
गुजरातच्या सागर पोतदारने अखेरच्या सत्रात दिलेली झुंज मोडून काढताना एम के गौतमने ओडिशाला विजयी आघाडी मिळवून दिली.
उद्या विश्रांतीचा दिवस असून मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी, मुंबई खिलाडीज विरुद्ध तेलगु योद्धाज यांच्यात पहिला सामना तर, दुसरा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध चेन्नई क्विक गन्स यांच्यात होणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एशिया कप: इरफान पठाणचे वकार युनूसला खडे बोल; म्हणाला, ‘बुमराह नाहीये तर…’
पुणे जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा: वैभव दहिभाते, सुयोग पाटील यांची विजयी सलामी
श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्या पोहोचला थेट शहांच्या दारी, श्रीलंका क्रिकेटची स्थिती सुभारण्यावरून झाली विशेष चर्चा






