भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदिप सिंगच्या जीवनावर या आठवड्यात 13 जुलैला चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संदिपची भूमिका करणारा दिलजीत दोसांझने हरियाणामध्ये संदिपच्या कुटुंबाला भेट दिली.
यावेळी संदिपच्या वडीलांनी दलजीतला संदिपची एक खास हॉकीस्टीक भेट दिली. ही हॉकीस्टीक संदिप जेव्हा पॅरालाइज्ड होता त्या संपूर्ण कालावधीत त्याच्याबरोबर होती.
संदिपला 2006 मध्ये दिल्ली-कालका शताब्दी एक्सप्रेसमध्ये असताना आरपीएफ जवानाकडून चूकून गोळी लागली होती. त्यामुळे त्याला जवळजवळ दोन वर्ष हॉकीपासून दूर राहावे लागले होते.
2008 मध्ये तो पुन्हा मैदानावर उतरला होता. त्याच्या पुनरागमनानंतर त्याने सुलतान अझलन शाहा कप स्पर्धेत भारताला उपविजेते केले होते.
त्याला गोळी लागण्याच्या घटनेनंतर डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते की तो यानंतर कधीही चालू शकणार नाही. त्यावेळी संदिपने डॉकेटरांना सांगितले की त्याच्या भोवती नकारात्मकता पसरवू नका.
त्याने त्याच्या भावाला त्याची हॉकीस्टीक हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितली होती. जेणेकरुन ती सतत डोळ्यासमोर राहिल आणि त्याला परत खेळण्याची प्रेरणा देईल.
Diljit Dosanjh visited hockey legend Sandeep Singh's hometown and met his family, before the release of #Soorma… Got a gift from Sandeep's father: Hockey stick… Same hockey stick that was with Sandeep throughout the period when he was paralyzed. pic.twitter.com/vm1GoQWTIW
— taran adarsh (@taran_adarsh) July 9, 2018
फ्लिकर सिंग-
संदिप सिंगला सर्वात धोकादायक ड्रॅग-फ्लिकर म्हणून ओळखले जात होते त्यामुळे त्याला फ्लिकर सिंग असेही म्हटले जाते.
त्याच्या पुनरागमनानंतर तो भारताचा कर्णधारही झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तसेच सुलतान अझलन शाहा कप स्पर्धेत त्याने सर्वाधिक गोलही केले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला दिग्गज होणार पॉंडेचरीचा कोच
-एबी डिव्हीलियर्सने आयपीएल सहभागाबद्दल घेतला मोठा निर्णय
-फिफा विश्वचषकामुळे पुढे ढकलला मोठा क्रिकेट सामना