इंग्लंड संघ 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. 25 जानेवारी ते 11 मार्च 2024 दरम्यान इंग्लंड भारतासोबत हे 5 सामने खेळणार आहे. (England tour of India, 2024). इंग्लंड संघाला कायमच भारतात खेळणे कठिण गेले आहे. परंतू यावेळी त्यांची मदत एक भारतीय खेळाडूच करणार आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक भारत दौऱ्यावर येत असलेल्या इंग्लंड लायन्स संघाला तयारीत मदत करणार आहे. खुद्द इंग्लंड संघानेच यासाठी त्याला बोलावले आहे.
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेच्या नऊ दिवस आधी इंग्लंड लायन्स भारतात सराव करणार आहे. यावेळी लायन्स संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याची निवड कऱण्यात आली आहे. तो या संघाचा कोचिंग टीमचा भाग असेल. कार्तिक भारतातल्या प्लेईंग कंडिशनचा माहिती सल्लागार म्हणून आपले अनुभव इंग्लंड संघाच्या खेळाडूंसोबत सांगताना दिसून येईल. (dinesh karthik becomes batting consultant of england lions team for india tour)
दिनेश कार्तिक इंग्लंड लायन्सचा मुख्य प्रशिक्षक नील किलीन(Neil Killeen), सहाय्यक प्रशिक्षक रिचर्ड डॉसन(Richard Dawson), कार्ल हॉपिकिग्सन(Carl Hopkinson) आणि पुर्व इंग्लिश स्पिनर ग्रीम स्वान (Graeme Swann) यांच्यासोबत काम करणार आहे. विशेष म्हणजे कार्तिक भारत विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपुर्वीच इंंग्लंड लायन्सचा हिस्सा बनणार आहे. त्याचा कार्यकाळ फक्त नऊ दिवसांचाच असणार आहे.
इंग्लंड लायन्स भारताच्या ‘अ’ संघासोबत अहमदाबादमध्ये 3 चार दिवसीय सामने खेळणार आहे. त्याअगोदर पहिला सराव सामना होणार आहे. सराव सामना आणि चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा यापुर्वीच झाली आहे.
इंग्लंड टीम भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी प्रत्येक बाजूने आपली तयारी भक्कम करायची आहे. कार्तिक सोडून इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज इयान बेल(Ian Bell) हा 18 जानेवारीला इंग्लंड टीमसोबत असणार आहे. बेल सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स सोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. या भारत दौऱ्यावर इंग्लंड कसोटी संघाची खरी कसोटी लागणार आहे, असे अनेक दिग्गजांचे मत आहे.
हेही लगेच पहा
YSRCP सोडल्यानंतर रायुडू करणार JSPमध्ये प्रवेश?, पवन कल्याणसोबतचे फोटो शेअर करत दिले संकेत
‘सर्व बातम्या खोट्या…’, पत्रिकार परिषदेत द्रविडकडून ईशन आणि अय्यरची पाठराखण! चर्चेला पूर्णविराम