नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून चाहत्यांना त्यांच्या आवडत्या संघांचे दर्शन घडणार आहे. परंतु तत्पूर्वी आयपीएल फ्रंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगच्या एका विधानानंतर क्रिकेट जगतात पुन्हा एकदा मांकडिंगच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे. जस-जशा आयपीएलच्या तारखा जवळ येत आहेत, तस-तसा खळाडूंमध्येही याबाबतच्या चर्चांनी वेग धरला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आयपीएल दरम्यान फिरकीपटू आर अश्विनने राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाज जॉस बटलरला मांकडिंग पद्धतीने बाद केले होते. त्यानंतर त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करत अनेक विवाद झाले होते.
आता आयपीएल २०२० साठी अश्विन दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडला आहे. त्याबद्दल प्रशिक्षक रिकी पाँटिंगने नुकतेच एक विधान करत म्हटले होते, तो याबाबतीत अश्विनशी चर्चा करेल की, तो पुन्हा मांकडिंगचा वापर करणार नाही. आता या मुद्द्यावर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपले मत स्पष्ट केले आहे. जर त्याच्या संघातील कोणत्याही गोलंदाजाने मांकडिंग केले तर काय होईल, हे त्याने सांगितले आहे.
ही गोष्ट खिलाडूवृत्तीशी नाही तर न्यायाशी जोडलेली आहे
‘क्रिकेट नेक्स्ट’शी बोलताना केकेआरचा कर्णधार कार्तिक म्हणाला की, “मला वाटते की चेंडू टाकण्यापूर्वी जेव्हाही फलंदाज रेषा ओलांडेल, तेव्हा त्याला मांकडिंगमार्फत बाद करण्याची परवानगी मिळाली पाहिजे.” कार्तिकचा असा विश्वास आहे की, “मांकडिंगला खिलाडूवृत्तीशी जोडले जाऊ नये. कारण जेव्हा चेंडूला बॅटची कड लागते (निक होणे) आणि तरीही फलंदाज क्रीजवरच उभा राहतो, तेव्हा ती खिलाडूवृत्ती कुठे जाते. मांकडिंगचा अर्थ न्यायाशी जोडलेला आहे, खिलाडूवृत्तीशी नाही.”
फलंदाजाला क्रीजवरच रहावे लागेल
“फलंदाजाने आपल्या क्रीजवरच राहिले पाहिजे. जर तो चेंडू टाकण्यापूर्वी बाहेर आला, तर त्यावेळी गोलंदाजाला त्याला धावबाद करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यामध्ये कोणतीही शंका नसायला पाहिजे. जेव्हा गोलंदाज असे करतो, तेव्हा लोकांना वाटते की हे चुकीचे आहे. परंतु जर फलंदाज आधीच २ मीटर बाहेर निघाला असेल, तेव्हा हे चुकीचे नाही का? असे याबद्दल माझे मत आहे,” असे पुढे बोलताना कार्तिक म्हणाला.
आपल्या संघातील गोलंदाजांना करू देणार नाही मांकडिंग
विशेष म्हणजे कार्तिकने मांकडिंगला योग्य असल्याचे सांगितले असले, तरी तो एक कर्णधार म्हणून याचा वापर आपल्या गोलंदाजांना करण्याची परवानगी देणार नाही.
तो म्हणाला, “एक कर्णधार म्हणून मी आपल्या गोलंदाजांना असे करण्याची परवानगी देणार नाही. जर माझ्या गोलंदाजांनी असे केले, तर मी ते मान्य करणार नाही. कारण मला वाटते की याची काही गरज नाही. आमचे गोलंदाज इतके सक्षम आहेत की, ते इतर मार्गांनी विकेट घेऊ शकतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
-चाहत्यांना पराभव लागला जिव्हारी; पेटवून दिली कार, १४८ जणांना झाली अटक
-राजवाड्यासारखे आहे रैनाचे घर, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
ट्रेंडिंग लेख-
-पंतप्रधानाच्या हत्येमुळे भारतीय संघाला सोडावा लागला पाकिस्तान दौरा अर्ध्यावर
-जेव्हा एका कैद्याच्या समर्थनार्थ चक्क खेळपट्टीवर खड्डे करून भरण्यात आले होते तेल…
-किचनमधील धुरामुळे झाला होता राडा, चालू क्रिकेट सामन्यात अग्निशामक दल घुसले मैदानात