भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना नागपूर येथे खेळला गेला. खराब मैदानामुळे तब्बल अडीच तास उशिराने सामना सुरू झाला. प्रत्येकी आठ षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 91 धावांचे आव्हान चार चेंडू राखून पार केले. अखेरच्या षटकात विजयासाठी नऊ धावांचे आव्हान असताना दिनेश कार्तिकने मैदानात येतात एक षटकार आणि एक चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. यासह त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, सध्या तो भारताचा प्रमुख फिनिशर म्हणून भूमिका का निभावत आहे.
Dinesh Karthik the finisher!! What a win by team India. pic.twitter.com/AdeOKoHIY3
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 23, 2022
ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार ऍरॉन फिंचच्या 31 व मॅथ्यू वेडच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर भारतासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्मा व केएल राहुल यांनी आक्रमक सुरुवात दिली. मात्र, एकापाठोपाठ सलग चार फलंदाज नियमित अंतराने बाद झाल्याने भारतीय संघ काहीच अडचणी सापडला होता. कर्णधार रोहित शर्मा एका बाजूने उभा होता.
हार्दिक पंड्या बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 7 चेंडूवर 13 धावांची गरज होती. रोहित शर्माने चौकार ठोकत अखेरच्या षटकात 9 धावा शिल्लक ठेवल्या. अखेरच्या षटकातील पहिला तसेच आपल्या खेळीतील पहिला चेंडू खेळण्यासाठी दिनेश कार्तिक स्ट्राइकवर आला. त्याने त्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला सामन्यात एकदम पुढे नेऊन ठेवले. पुढील चेंडूवर देखील त्याने चौकार वसूल करत भारताला चार चेंडू राखून विजय मिळवून दिला.
आयपीएल 2022 पासून 37 वर्षीय कार्तिक तुफान फॉर्ममध्ये आहे. आरसीबीसाठी त्याने फिनिशरची भूमिका निभावली होती. त्यानंतर तो भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला होता. सध्या तो भारतासाठीही फिनिशन म्हणून आपली कामगिरी चोख बजावत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितची रिप्लेसमेंट तयार! रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फलंदाजाने ठोकले नाबाद द्विशतक
दिल्ली-मुंबई जडेजाला आपल्या संघात घेण्यास उत्सुक; सीएसकेने दिले हे उत्तर