मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो आरसीबीचा फलंदाज दिनेश कार्तिकची खेचताना दिसतोय. हा व्हिडिओ मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्याचा आहे. या सामन्यात दिनेश कार्तिकनं 23 चेंडूत 5 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 53 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर आरसीबीला 196 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, ही धावसंख्या आरसीबीला विजयासाठी पुरेशी ठरली नाही. मुंबई इंडियन्सनं अवघ्या 15.3 षटकांत 3 गडी गमावून धावांचा पाठलाग केला. मुंबईचा चालू हंगामातील हा दुसरा विजय आहे.
दिनेश कार्तिक मुंबई इंडियन्सविरुद्ध फलंदाजी करत असताना रोहित शर्मा त्याच्यासोबत मस्ती करत होता. रोहित शर्मा दिनेश कार्तिकला म्हणत होता, “शाब्बास डीके! त्याला टी-20 विश्वचषकात निवडीसाठी जोर लावायचा आहे. त्याच्या मनात विश्वचषक आहे.” रोहित शर्माची ही कमेंट स्टंपच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Rohit Sharma to Dinesh Kartik- Worldcup khelna h Worldcup 😂😂
Sharma ji aur stump mic 😂😂
Never Ending Story 😂 pic.twitter.com/2jRPThpo9u— Avishkar Mulik (@mulik_avishkar) April 11, 2024
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून 2022 च्या टी-20 विश्वचषकात स्थान मिळवलं होतं. अशा परिस्थितीत, .यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते. टी 20 विश्वचषकाला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला किमान एक महिना अगोदर आपला संघ जाहीर करावा लागेल. अशा परिस्थितीत बीसीसीआय एप्रिलच्या अखेरीस भारतीय संघाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कर्णधार फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिकच्या अर्धशतकांच्या जोरावर 196 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं शानदार गोलंदाजी करत 5 गडी बाद केले.
प्रत्युत्तरात, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं अवघ्या 15.3 षटकांत हे लक्ष्य गाठलं. सूर्यानं 19 चेंडूत 52 धावा केल्या, तर किशननं 34 चेंडूत 69 धावांची शानदार खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-