तब्बल 1443 दिवसांनंतर भारतीय संघाचा जबरदस्त फलंदाज चेतेश्वर पुजारा याने बांगलादेशविरुद्ध कसोटी शतक झळकावले. बांगलादेश संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याला शतक झळकावता आले नव्हते. त्याने 90 धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात त्याने आपले शतक साकारले. त्याने नाबाद 102 धावा चोपल्या. विशेष म्हणजे, पुजाराचे हे कसोटीतील सर्वात वेगवान शतक होते. पुजाराच्या शतकानंतर त्याच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. आयपीएल 2023 लिलावापूर्वी पुजाराने शतक केल्यामुळे त्याची सर्वत्र त्याची होत आहे. मात्र, दिनेश कार्तिक याला असे वाटते की, पुजारा या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक नाहीये.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचे म्हणणे यावरून सिद्ध होते की, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने आयपीएल 2020 लिलावासाठी (IPL 2023 Auction) नावनोंदणी केली नाही. पुजारा याने 2014च्या आयपीएल हंगामात पदार्पण केले होते. पुजाराविषयी बोलताना कार्तिक म्हणाला की, अनुभवी फलंदाजाने आपला रस्ता स्पष्ट केला आहे. तसेच, त्याला समजले आहे की, आयपीएल त्याच्यासाठी नाहीये.
काय म्हणाला दिनेश कार्तिक?
पुजाराबद्दल बोलताना कार्तिकने म्हटले की, “खरं तर मला वाटत नाही की, चेतेश्वर पुजारा आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे. मागील काही वर्षांमध्ये पुजाराने प्रयत्न केला आहे. मात्र, त्याला आता समजले आहे की, आयपीएल त्याच्यासाठी बनलेलीच नाहीये. पुजारा उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहे. तो आपल्या कौशल्यांवर आणखी मेहनत घेत आहे. तसेच, क्रिकेटवर लक्ष देत आहे.”
पुढे बोलताना कार्तिक म्हणाला की, “आयुष्याच्या अशा वळणावर कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाहीये. तुम्हाला कुठे खेळायला आवडते आणि लोकांना माझ्या फलंदाजीतील कोणता पैलू आवडतो, याला महत्त्व आहे.”
पुजाराच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने फक्त 30 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 20.53च्या सरासरीने आणि 1 अर्धशतकाच्या मदतीने 390 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, कार्तिकच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 229 सामन्यात फलंदाजी करताना 26.85च्या सरासरीने 4376 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 20 वेळा अर्धशतकांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान नाबाद 97 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. (dinesh karthik on cheteshwar pujara says about ipl 2023 know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयशी पंगा घेणाऱ्या रमीज राजांचे अध्यक्षपद धोक्यात? ‘हा’ आहे नवीन दावेदार
चौथ्या दिवशीच संपला असता पहिला कसोटी सामना, पण पंतकडून झाली मोठी चूक; फलंदाज बाद असूनही…