---Advertisement---

कार्तिकला वाटतेय या गोष्टीची खंत; म्हणाला, “मी खूप आधीच…”

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 7:20 PM
---Advertisement---

ज्या वयात बहुतेक खेळाडू निवृत्त झालेले असतात किंवा निवृत्तीचा विचार करत असतात त्या वयात दिनेश कार्तिक भारतीय संघात परतला आहे. या अनुभवी फलंदाजाने आपल्या खेळात कमालीचा बदल करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. मात्र, आता कार्तिकने एका अशा गोष्टीचे कबुली दिली आहे जी त्याला खूप आधी करायला हवी होती.

सध्या ३७ वर्षाच्या असलेल्या कार्तिकने आयपीएलपासून चांगली कामगिरी सुरू ठेवली असून, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी त्याने आपला दावा ठोकला आहे. नुकतेच, वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने १९ चेंडूत नाबाद ४१ धावा करून विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आलेले.

फ्लोरिडा येथे होणाऱ्या मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी कार्तिक पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत बोलताना कार्तिकने आपल्या कारकीर्दीविषयी बोलताना एक महत्त्वाचे विधान केले. कार्तिक म्हणाला,

“पावर हिटिंग ही अशी गोष्ट आहे जिच्यावर मी खूप मेहनत केली आहे. मला आता असे वाटत आहे की, या गोष्टीवर मी पूर्वीच मेहनत घ्यायला हवी होती. मात्र, सर्व काही सुरळीत सुरू आहे.”

दिनेश कार्तिकने मागे म्हटले होते की, “सध्याच्या संघ व्यवस्थापनाने मला खूप पाठिंबा दिला आहे. मी यशस्वी होवो अथवा अपयशी होवो, दोन्ही वेळी समान वागणूक दिली जाते. सध्याचा नेतृत्व गट आणि सपोर्ट स्टाफच्या पाठिंब्यामुळे मला पुनरागमनात मदत झाली आहे.”

दिनेश कार्तिक याला सध्या संघाचा सर्वोत्तम फिनीशर मानले जात आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी त्याची जागा आत्तापासूनच पक्की मानली जातेय.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषकाच्या तयारीवरून दिनेश कार्तिकचे बडे बोल! म्हणाला, ‘भारताला…’

इंग्लंडला बगल देत टीम इंडियाने गाठली फायनल! स्म्रीतीचे अर्धशतक तर गोलंदाजीत ‘या’ खेळाडूने दाखवले कसब

CWG BREAKING: महाराष्ट्र सुपुत्र अविनाश साबळेने रचला ‘रूपेरी’ इतिहास; मोडले केनियाचे २४ वर्षांचे वर्चस्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---