आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) एकदिवसीय विश्वचषक 2019नंतर दिग्गज दिनेश कार्तिक भारतीय संघातून बाहेर होता. यादरम्यान तो आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) आणि देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. यामध्ये त्याला अपेक्षित प्रदर्शन करता येत नव्हते. असे असले तरी आयपीएल 2022च्या हंगामात त्याने हे सर्व चित्र पालटवले. सध्या तो पुन्हा एकदा भारतीय संघात सहभागी झाला आहे. त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली असता समजते की, त्याने असे काही केले आहे, जे शक्यतो इतर कोणत्याही खेळाडूला जमले नसेल. गुरुवारी (दि. 1 जून) कार्तिक 38वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याच्याविषयी खास गोष्ट जाणून घेऊयात…
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारतीय संघाच्या 9 कर्णधारांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. आयसीसीचे मिळून कार्तिक एकूण 11 कर्णधारांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. या 11 कर्णधारांपैकी एक कर्णधार हा पाकिस्तानचा आहे.
दिनेश कार्तिकने 2004 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतासाठी त्याने पहिला सामना सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खेळला. त्याच वर्ष कार्तिकने कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केले. पहिल्या कसोटी सामन्यात कार्तिक सध्याचा मुख्य़ प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वात खेळला होता. तसेच 2006 मध्ये टी-20 क्रिकेटला सुरुवात झाली आणि कार्तिक पहिल्या सामन्यापासून भारतीय संघात सहभागी होता. तेव्हा टी-20 संघाचे कर्णधारपद विरेंद्र सेहवागकडे होते आणि पहिला सामना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होता.
गांगुली, द्रविड आणि सेहवागच्या नेतृत्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने पुढे अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात भारताचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये सर्वात पहिले नाव घ्यावे लागेल ते म्हणजे एमएस धोनीचे. तसेच विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि आता रिषभ पंत (Rishabh Pant) यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी कार्तिकला मिळाली आहे. हार्दिक पंड्या याने 2022 जूनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यातही कार्तिकने प्रतिनिधित्व केले होते. एवढेच नाही आयसीसी एलेव्हनमध्ये पाकिस्तानी दिग्गज शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वातही कार्तिक खेळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 17: धोनी आधी पदार्पण करुनही 14 वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
टीम इंडियाची ‘पेस’ बॅटरी रिचार्ज होण्यासाठी एनसीएत! सैनीने शेअर केली खास छायाचित्रे