गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माची भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिष्ठा खूप वाढली आहे. तो भारतीय क्रिकेटमधील सध्याचा सर्वात मोठा खेळाडू बनला आहे. बीसीसीआयने प्रथम रोहितकडे टी२० नंतर वनडे आणि आता तो कसोटी कर्णधार बनला. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा पहिल्यांदाच क्रिकेटच्या या जुन्या प्रकारात कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. मात्र, रोहित शर्माकडे तिन्ही प्रकारच्या संघाचे कर्णधारपद सोपवल्यानंतर वरिष्ठ फलंदाज दिनेश कार्तिकने मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. दिनेश कार्तिकने एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधताना सांगितले की, रोहित शर्मा किती क्रिकेट खेळणार आहे? दिनेश कार्तिकने रोहित शर्माच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एका क्रिकेट संकेतस्थळाशी संवाद साधताना दिनेश कार्तिक म्हणाला, “मला वाटते की रोहित शर्मा खूप हुशार कर्णधार आहे. मात्र, तो किती क्रिकेट खेळेल, यावर प्रश्नचिन्ह आहे. सध्या रोहित अशा परिस्थितीत आहे, जिथे वर्षभर सतत क्रिकेट खेळायचे असते. रोहितसारख्या खेळाडूसाठी हे मोठे आव्हान असेल. तो एक महान कर्णधार आहे यात शंका नाही. रणनीतीचा विचार केला तर तो खेळाडूंच्या खूप पुढे आहे. याचा प्रत्यय वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत आला. रोहितने गोलंदाजांचा चांगला वापर केला. त्याने आवेश खानला सांभाळून सांभाळून घेतले. शार्दुलने पहिल्या षटकात १८ धावा दिल्यानंतरही त्याची ४ षटके २ विकेट्स आणि ३३ धावा अशी संपली. रोहितला गोलंदाजांकडून काय करून घ्यायचे ते समजते. मात्र, तो किती क्रिकेट खेळणार हा प्रश्न नेहमीच पडतो.”
आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग बनलेल्या दिनेश कार्तिकचा रोख प्रामुख्याने रोहित शर्माच्या फिटनेसकडे होता. कारण, रोहित सातत्याने दुखापतींशी झुंज देत आहे. या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे भारतीय संघाचे बरेच नुकसान झाले. पुढील दोन वर्षे भारतीय संघाला भरपूर क्रिकेट खेळायचे आहे, ज्यामध्ये आयपीएलचा समावेश आहे, त्यामुळे रोहित शर्माला दुखापत होण्याचा धोका नेहमीच असेल.
महत्वाच्या बातम्या-
वाद तापल्यानंतर अखेर साहाने घेतली माघार! ‘त्या’ पत्रकाराविषयी म्हणाला… (mahasports.in)
ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावून फसले आयपीएल संघ; वाचा सविस्तर (mahasports.in)
भारतीय महिला संघाची न्यूझीलंडविरुद्ध शरणागती! स्वीकारला सलग चौथा पराभव (mahasports.in)