भारतीय क्रिकेट संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक नाव अनुभवी फिरकीपटू रविचंद्र अश्विन याचे आहे. अश्विन मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नसला तरी, तो कसोटी संघातील नियमित सदस्य आहे. याव्यतिरिक्त तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. असे असतानाच अनेकदा त्याचे नाव भारताच्या कर्णधार पदासाठी देखील चर्चेत राहिलेले आहे. आता त्याचाच संघ सहकारी असलेल्या दिनेश कार्तिक याने त्याला भारताचा कर्णधार म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अश्विन मागील वर्षापासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नाही. असे असले तरी 37 वर्षीय अश्विन कसोटी संघाचा प्रमुख भाग आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याला संधी न मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ भारतात विश्वचषक खेळणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल. भारताचा प्रमुख संघ विश्वचषकासाठी तयारी करत असतात, दुसरा संघ ही स्पर्धा खेळत असेल. याच मुद्द्यावर बोलताना कार्तिक म्हणाला,
“अश्विन विश्वचषकाच्या योजनेचा भाग नसेल तर, आशियाई स्पर्धेमध्ये त्याला संधी देण्यात यावी. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व देखील दिले गेले तरी विशेष वाटणार नाही. वैयक्तिक मला त्याला भारताचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल.”
तो पुढे म्हणाला,
“त्याने भारतीय संघासाठी जे काही केले आहे, ते सर्वजण करू शकत नाही. कसोटी क्रिकेटचा तो एक महान खेळाडू ठरतो. कर्मधार होण्याची संधी त्याला मिळाली तर, हा त्याच्या दैदिप्यमान कारकिर्दीतील एक मानाचा तुरा असेल.”
आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही स्पर्धा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू होऊन, ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपन्न होईल. तर वनडे विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
(Dinesh Karthik said I believe Ashwin deserves to captain India once)
महत्वाच्या बातम्या-
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय
अमेलिया-सोफीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दमदार विजय, श्रीलंकेला 111 धावांनी पत्करावी लागली हार