---Advertisement---

सहकारीच म्हणतोय, “आता राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळावे”; कारणही सांगितले

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 11:29 PM
KL-Rahul
---Advertisement---

बांगलादेशविरुद्ध भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून, पहिला सामना रविवारी (4 डिसेंबर) ढाका येथे खेळला जाणार आहे. याच सामन्यापासून भारतीय संघाच्या मिशन वर्ल्डकपची सुरुवात होईल. त्याचवेळी पुढील विश्वचषकात केएल राहुल याने कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी, याबाबत भारताचा वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने आपले मत व्यक्त केले आहे.

बांगलादेश दौऱ्यापासून खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या 2023 वनडे विश्वचषक मोहिमेला सुरुवात होईल. या विश्वचषकाआधी भारतीय संघाला तब्बल 25 वनडे सामने खेळण्यासाठी मिळणार आहेत. तसेच विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी संघ संयोजन काय असेल याबाबत चर्चा होताना दिसतेय.

भारतीय संघासाठी रोहित शर्मा व शिखर धवन सलामीवीर असण्याची शक्यता आहे. तर, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहली व सूर्यकुमार यादव दिसतील. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या याचे खेळणे देखील निश्चित आहे. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? याबाबत सर्वांना उत्सुकता असेल.

याच प्रश्नावर बोलताना दिनेश कार्तिक एका मुलाखतीत म्हणाला,

“पाचव्या स्थानासाठी पंत व राहुल यांच्यामध्ये स्पर्धा आहे. मात्र, वनडे क्रिकेटचा विचार केल्यास राहुल त्याला सरस जाईल. मला नक्कीच वाटते की राहुल पुढील विश्वचषकात एक मध्य फळीतील फलंदाज म्हणून आपली जबाबदारी वाहील.”

नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात राहुल सलामीवीर म्हणून पुरता अपयशी ठरला होता. मात्र, वनडे संघात धवन हा सलामीचा पहिला पर्याय असल्याने राहुलला मधल्या फळीतच खेळावे लागू शकते.

(Dinesh Karthik Said Rahul Number Five In 2023 ODI World Cup)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड विरुद्ध शतक ठोकताच बाबर आझमने केला विक्रम, कोहली- रोहित आसपासही नाही
जमशेदपूर एफसीला विजय आवश्यक; रविवारी त्यांच्यासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---