भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू गोलंदाज रविचंद्नन अश्विनने त्याच्या गोलंदाजीविषयी नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तो म्हणाला होता की, त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये काही बदल केले आहेत, ज्याला लोक अजूनही लेग आर्म बॉल किंवा कॅरम बॉल म्हणतात. त्यानंतर आता भारताचा यष्टीरक्षम फलंदाज दिनेश कार्तिकने अश्विनने गोलंदाजीत केलेल्या बदलांविषयी त्याचे मत मांडले आहे. कार्तिकच्या मते अश्विनची गोलंदाजी फिंगर स्पिनर आणि मिस्ट्री स्पिनर या दोन्हीच्या मध्ये येते. अश्विन एका सामान्य ऑफ स्पिनरच्या रूपात राहू इच्छित नसल्याचेही कार्तिकने यावेळी सांगितले.
कार्तिक क्रिकबजशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “मला पूर्णपणे समजले की, तो काय म्हणत आहे. तो जगातील इतर फिंगर स्पिनवाल्या ऑफ स्पिनरप्रमाणे बांधून राहू इच्छित नाही. अश्विन असे म्हणाला, कारण त्याच्याकडे कॅरम बॉल आहे. तो लेग स्पिनरप्रमाणे विचार करतो, तेव्हा उजव्या हात्याच्या फलंदाजाला बाहेरच्या दिशेला चेंडू टाकतो आणि डाव्या हात्याच्या फलंदाजासोबत स्टॉक बॉलचा उपयोग जास्त करतो, जो की ऑफ स्पिन आहे. त्याची इच्छा आहे की, जगाने त्याला फक्त फिंगर स्पिनर न समजता अष्टपैलू प्रतिभेचा खेळाडू समजावे. माझ्या मते तो फिंगर स्पिनर आणि मिस्ट्री स्पिनरच्या मध्ये कुठेतरी आहे. आम्हाला त्याचा शब्द अजून नाही मिळाला, पण तो त्यामध्येच कुठेतरी आहे.”
रविचंद्रन अश्विनला २०१७ मध्ये मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर केल्यानंतर त्याच्या प्रदर्शानामध्ये सुधारणा झाली, असे कार्तिकने सांगितले आहे. “मला एक गोष्ट माहित आहे. जेव्हा अश्विन संघाच्या बाहेर गेला होता, तेव्हा त्याला वाटले की, लोक त्याला फक्त फिंगर स्पिनर मानतात. त्याची इच्छा आहे की, लोकांना असे वाटावे की, तो लेग स्पिन, सीम पोजीशन, इतर मिश्रणांचा उपयोग करू शकतो. रिस्ट स्पिनर काय करतो? फिंगर स्पिनरच्या तुलनेत त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी जास्त अडचण का येते? फिंगर स्पिरनविषयी तुम्हाला माहित आहे की, चेंडू एका दिशेने टर्न करत आहे आणि तुम्ही त्याच्यावर तुमचा स्टान्स बनवू शकता. अश्विन काय करतो? होय तो ऑफ स्पिन करतो, पण तो नकल बॉल किंवा कॅरम बॉलनेही फलंदाजांना हैराण करतो,” असेही कार्तिक पुढे बोलताना म्हणला.
दरम्यान, रविचंद्रन अश्विनने यावर्षी टी२० विश्वचषकाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये भारतासाठी चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध १४ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याचे हे प्रदर्शन संघाच्या विजयामध्ये महत्वाचे ठरले. त्याव्यतिरिक्त त्याने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यातही एक महत्वाची विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी