---Advertisement---

वर्ल्डकपसाठी निवड झाल्यावर कार्तिकचे फक्त चार शब्दांचे भावनिक ट्विट

On: सोमवार, सप्टेंबर 12, 2022 9:18 PM
DK
---Advertisement---

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची सोमवारी (12 सप्टेंबर ) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या 15 सदस्यीय संघात सर्वच पारखलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या आयपीएलपासून जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यालादेखील संघात जागा मिळाली. संघात निवड झाल्यानंतर कार्तिकने आता ट्विटरवर एक चार शब्दांचे ट्विट लिहित आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी व वरिष्ठ खेळाडू असलेल्या कार्तिकला या संघात जागा मिळणे जवळपास नक्की समजले जात होते. यावर्षी झालेल्या आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्याने आयपीएलमध्ये अनेक वेळा आरसीबीला संघातून बाहेर काढले. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी दिली गेली होती. त्या संधीचे देखील सोने करत त्याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले. त्याचवेळी संघाचा दुसरा यष्टीरक्षक रिषभ पंत वेळोवेळी अपयशी ठरल्याने कार्तिकची विश्वचषकासाठी जागा नक्की झाली. आता अधिकृतरित्या त्याची संघात निवड झाल्यानंतर, त्याने ट्विटर हँडलवरून ‘Dreams Do Come True’ म्हणजे स्वप्न सत्यात उतरतात अशा आशयचे ट्विट केले. यासह त्याने एक निळी हार्ट इमोजी देखील पोस्ट केली.

 

भारतीय संघाने 2006 मध्ये खेळलेल्या पहिल्या टी20 सामन्यात कार्तिक संघाचा भाग होता. त्यानंतर बराच काळ तो संघाबाहेर देखील राहिला. 2018 निदहास ट्रॉफीत तो भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला. 37 वर्षीय कार्तिकने आतापर्यंत आपल्या टी20 कारकिर्दीत 50 सामन्यात 139 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 592 धावा केल्या आहेत.

टी-२० विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ– 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

क्या बात! सलग आठ टी20 विश्वचषकात टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ एकमेव खेळाडू
अरे, याला नाही घेणार टीममध्ये! आता ‘तोच’ झालायं भारताच्या टी20 विश्वचषक संघात इन
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---