---Advertisement---

फाफ डू प्लेसिस विश्वचषकात खेळलाच पाहिजे! भारतीय दिग्गजाचा दक्षिण आफ्रिका बोर्डाला सल्ला

On: शुक्रवार, मे 19, 2023 5:43 PM
Faf Du Plessis Dinesh Karthik
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या सलामीवीर जोडीसाठी अप्रतिम राहिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी या दोघांनी गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 172 धावांची भागीदारी केली. विराटने या सामन्यात शतक केले असून डू प्लेसिसने 71 धावांचे योगदान दिले. या वादळी खेळीच्या पार्श्वभूमीवर या दोघांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशात भारतीय संघाचा दिग्गज दिनेश कार्तिक याने डू प्लेसिसला दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने लीगच्या पहिल्या 13 सामन्यांमध्ये 702 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 58.50 आणि स्ट्राईक रेट 153.95 राहिला आहे. चालू हंगामात फाफने एकूण आठ अर्धशतके केली आहेत. फाफचे प्रदर्शन पाहून त्याला वनडे विश्वचषक 2023मध्ये खेळावे अशी इच्छा व्यक्त होत आहे. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचीही अशीच इच्छा आहे की, फाफला आगामी वनडे विश्वचषक खेळण्याची संधी मिळावी.

आयसीसी रिव्यूमध्ये बोलताना कार्तिक म्हणाला, “मी फाफ डू प्लेसिसचा फॉर्म पाहून हैरान नाहीये. कारण माझ्या मते तो जबरदस्त खेळाडू आहे. तो खूप चांगला लिडर देखील आहे. मागच्या चार-पाच आयपीएल हंगामांमध्ये त्याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. यावर्षीही त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. अशात विश्वचषकात त्याला खेळवले गेले नाही, तर दक्षिण आफ्रिका संघाचे नुकसान असेल. विश्वचषक खेळण्यासाठी फाफ पूर्णपणे तयार आहे. तो एक असा खेळाडू आहे, जो कर्णधार आणि फलंदाज म्हणून सामन्यावर मोठा प्रभाव टाकू शकतो.”

दरम्यान, फाफने 2021साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. फेब्रुवारी 2021मध्ये त्याने आफ्रिकी संघासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फाफ खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मात्र मागच्या दोन वर्षांमध्ये त्याला एकदाही दक्षिण आफ्रिकेकडून वनडे किंवा टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये. असे असले तरी, आयपीएल 2023मध्ये फाफने केलेले प्रदर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे. अशात दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापन त्याला पुन्हा संघात सामील करणार का? हे येत्या काळात पाहणे औत्सुक्याचे असेल.  (Dinesh Karthik wants Faf du Plessis to get a chance to play for South Africa in the World Cup )

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सहा तास तिथं होतो, पण तो माझ्याशी बोललाही नाही…’, युवा फलंदाजावर सेहवाग नाराज
राष्ट्र प्रथम! आयपीएल खेळतोय तरी विराटचे लक्ष WTC फायनलवर, सामन्यानंतर म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---