भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यावर्षी आयपीएल खेळताना दिसेल. कदाचित कार्तिकचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल. माध्यमांतील वृत्तांनुसार दिनेस कार्तिक आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो. लवकरच वयाची 39 वर्ष पूर्ण करणारा कार्तिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देखील निवृत्ती जाहीर करू शकतो.
दिनेश कार्तिक त्या सात खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने आयपीएलचा प्रत्येक हंगाम खेळला आहे. एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शऱ्मा, शिखर धवन, ऋद्धिमान साहा, मनीष पांडे आने दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांनी आतापर्यंत एकही आयपीएल हंगाम न खेळता सोडला नाहीये. प्रत्येक हंगामात या खेळाडूंना खरेदीदार मिळाले आणि प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळाले. विशेष म्हणजे आतापर्यंत खेळलेल्या 16 आयपीएल हंगामात कार्तिक केवळ दोन सामने खेळू शकला नाही.
दिल्ली डेअरडेविल्स (2008-14), किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्स 2011), मुंबई इंडियन्स (2012-13), गुजरात लॉयंस (2016-17), नाइट राइडर्स (2018-21) आणि आरसीबी (2015, 2022, 2023) या सहा संगांकडून कार्तिक खेळला आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचा त्याचा अनुभव जबरदस्त आहे. 240 आयपीएल सामन्यांमध्ये 26च्या सरासरीने 4516 धावा त्याने केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षकाच्या रुपात धोनीनंतर कार्तिक दुसरा सर्वात यशस्वी खेळाडू राहिला आहे. 133 खेळाडूंना त्याने यष्टीपाठी बाद केले. यातील 36 स्टंपिंग होत्या.
आयपीएल 2022 पूर्वी आरसीबीने कार्तिकला 5.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. पण त्याच हंगामात कार्तिकने जोरदार प्रदर्शन केले होते. आरसीबीचा फिनिशर म्हणून त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. 16 सामन्यात 55च्या सरासरीने 330 धावा त्याने केल्या. पण आयपीएल 2023 मध्ये कार्तिकचे प्रदर्शन सुमार होते. त्याने मागच्या हंगामात 11च्या सरासरीने 140 धावा केल्या होत्या. अशात यावर्षी आयपीएल 2024 मध्ये कार्तिक आपला शेवटचा सामना खेळला, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नसेल. आतापासूनच अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. (Dinesh Karthik will retire from cricket after the end of IPL 2024)
महत्वाच्या बातम्या –
फोटो ऑफ द डे! 100व्या कसोटीसाठी अश्विनसोबत फॅमिलीही मैदानात, द्रविडकडून मिळाली खास कॅप
Video: श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये पुन्हा राडा! बॅटला चेंडू लागूनही तिसऱ्या अंपायरनं दिलं नॉट आऊट