बरोबर ४ वर्षांपूर्वी म्हणजेच १८ मार्च २०१८ रोजी भारतीय संघाने बांगलादेश संघाला ४ विकेट्सने पराभूत करत निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. भारत, श्रीलंका आणि बांगलादेश संघात पार पडलेल्या या तिरंगी टी२० मालिकेत भारत विरुद्ध बांगलादेश संघात अंतिम सामना पार पडला होता.
रोमांचक झालेल्या या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताला निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. या सामन्यानंतर सर्वच स्थरातून कार्तिकचे कौतुक झाले होते.
झाले असे की या सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही भारताच्या विकेट्स नियमित अंतराने गेल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ५६ धावांची खेळी केली होती. पण भारताने आव्हान पूर्ण करण्याआधीच बाद झाला होता.
त्यामुळे ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिनेश कार्तिकने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी घेत आक्रमक खेळ केला. तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताला १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती.
त्याने विजय शंकरला हाताशी घेत ३ षटकार आणि २ चौकारांसह ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. मात्र शंकर(१७) शेवटच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १ चेंडू ५ धावा असे समीकरण उभे राहिले. या चेंडूवर कार्तिकने षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला होता. हा विजय मिळवल्यानंतर कार्तिकचे खूप कौतुक झाले होते.
#OnThisDay in 2018, India defeated Bangladesh by 4️⃣ wickets in the Nidahas Trophy final 🏆
Here’s how the match played out 👇 pic.twitter.com/PQc6gwp8bz
— ICC (@ICC) March 18, 2020
विशेष म्हणजे या सामन्यापुर्वी कार्तिकने एक ट्विट केला होता. त्यात त्याने ‘हा या दौऱ्याचा (श्रीलंका दौऱ्याचा) शेवटचा दिवस आहे. आम्ही याचा शेवट अनोख्या पद्धतीने करु’ असे म्हटले होते. त्याने जे सामन्यापुर्वी म्हटले ते करुन दाखवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनने बरोबर १० वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळलेला ‘तो’ सामना अविस्मरणीयच, कारणही आहे खास
मराठीत माहिती- क्रिकेटर एकनाथ सोलकर
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा