---Advertisement---

IPL 2027: आयपीएलच्या इम्पॅक्ट प्लेअर नियमावर दिनेश कार्तिकचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाला?

On: शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 6:41 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier league) इम्पॅक्ट प्लेअरचा नियम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक खेळाडूंनी या नियमावर टीका केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनीही हा नियम क्रिकेटसाठी नुकसानकारक असल्याचे म्हटले आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत आहे.

आता आयपीएलच्या 20व्या हंगामापूर्वी, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik on Impact player rule) या नियमाबाबत मोठे विधान केले आहे.

दिनेश कार्तिकच्या मते, इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमामुळे अष्टपैलू खेळाडू घडण्याच्या संधी कमी होत आहेत. त्याने या नियमावर टीका केली असली, तरी आयपीएलच्या 2027 मधील हंगामातही हा नियम कायम ठेवण्याचे समर्थन केले आहे.

क्रिकबझशी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, जेव्हा हा नियम पहिल्यांदा लागू करण्यात आला, तेव्हा तो खूप चांगला वाटला. कारण, त्यावेळी मोठ्या धावसंख्येचे सामने होत होते आणि अनेक संघ लक्ष्याचा पाठलाग करताना विजयाच्या जवळ पोहोचत होते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या हंगामात अटीतटीचे सामने फारच कमी पाहायला मिळाले. एका संघाने मोठी धावसंख्या उभारायची आणि दुसऱ्या संघाने सहजपणे लक्ष्य गाठायचे, असे चित्र पाहायला मिळते.

इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचा आयपीएलवर काय परिणाम झाला, हे पाहिल्यास सुरुवातीला त्याचा सकारात्मक परिणाम झाला होता. मात्र, हळूहळू या नियमाचे आकर्षण कमी झाले आणि तो लागू करण्यामागचा उद्देशही कमी होत गेला. या नियमामुळे भारतात अष्टपैलू खेळाडू घडण्याच्या संधी कमी झाल्याचेही कार्तिकने सांगितले.

तो म्हणाला, या नियमामुळे सामन्यांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक धावा होण्यास मदत झाली. मात्र, क्रिकेटमध्ये भारतासारख्या देशात अष्टपैलू खेळाडू घडण्याच्या शक्यता निश्चितच कमी झाल्या आहेत. तरीही, या हंगामासाठी हा नियम रद्द करावा, असे मला वाटत नाही. कारण, संघांची निवड करताना इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमाचा विचार करूनच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---