भारताच्या स्टार स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या जोडीने रविवारी (७ ऑगस्ट) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकले. भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्लेऑफ सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या लोबान डोना आणि कॅमेरॉन पीले यांचा ११-८, ११-४ असा पराभव केला. दीपिका पल्लीकलच्या या यशाबद्दल तिचा पती आणि टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने ट्विट करून अभिनंदन केले आहे.
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, “मेहनत आणि समर्पणाचे फळ मिळाले…तुम्हा दोघांवर खूप आनंद आणि अभिमान आहे.” दुसरीकडे त्याच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. पत्नीच्या यशाबद्दल लोकही त्यांचे अभिनंदन करत आहेत. कार्तिक सध्या टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत होता, त्यामुळे तो पत्नीसोबत इंग्लंडला जाऊ शकला नाही. भारतीय संघाने ही मालिका ४-१ने जिंकली.
It's here!! 🥳
The effort and perseverance has paid off…so happy and proud of both of you!@DipikaPallikal @SauravGhosal #CWG22 pic.twitter.com/sHaJgXoGy1— DK (@DineshKarthik) August 7, 2022
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल यांच्या पदकांच्या खेळातील खास गोष्ट म्हणजे २०१८च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्सचा अंतिम सामना या दोन जोडींमध्ये खेळला गेला आणि त्यानंतर भारतीय जोडीने रौप्यपदक जिंकले. मात्र रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये दीपिका आणि घोसाल यांनी ऑस्ट्रेलियन जोडीला एकही संधी दिली नाही आणि सामना सहज जिंकला. घोषालचे या खेळांमधील हे दुसरे पदक आहे. त्याने या आठवड्यात पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले, जे या प्रकारातील देशाचे पहिले पदक आहे.
दुसरीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही कांस्यपदक जिंकल्याबद्दल दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या जोडीचे अभिनंदन केले आणि अशा विजयामुळे आपल्या देशातील खेळांची लोकप्रियता वाढेल असे सांगितले. तुमचा ‘पोडियम फिनिश’ (टॉप थ्री) भारतातील स्क्वॅशप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे,’ असे राष्ट्रपतींनी ट्विट केले. तुमचे पोडियम फिनिश हे भारतातील स्क्वॅश प्रेमींसाठी प्रेरणादायी आहे. अशा विजयांमुळे आपल्या देशातील खेळांची लोकप्रियता वाढते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट
CWG CRICKET: हरमन-जेमिमाची झुंज अपयशी; अखेर क्षणी बाजी पलटवत ऑस्ट्रेलियाचा सुवर्णपदकावर कब्जा