वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गन यांच्यातील वादासाठी दिनेश कार्तिकवर टीका केली आहे. वीरेंद्र सेहवागच्या मते, या संपूर्ण वादासाठी कार्तिक सर्वात मोठा जबाबदार आहे.
शारजामध्ये अश्विन आणि केकेआरच्या खेळाडूंमध्ये ओव्हर थ्रोवर धावा घेण्यावरून वाद झाला होता. आधी अश्विन आणि टीम साउदी यांच्यात भांडण झाले आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विनचा केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनशीही वाद झाला.
खरं तर, जेव्हा केकेआरचा खेळाडू क्षेत्ररक्षण करत असतांना त्याने खेळपट्टीच्या दिशेने चेंडू फेकला, तेव्हा चेंडू दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतच्या हाताला लागला आणि दुसरीकडे गेला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने त्यावर एक धाव घेतली. यामुळे केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गन नाराज झाला होता. यानंतर अश्विनचा टीम साऊदी आणि मॉर्गनशीही वाद झाला होता.
या वादादरम्यान दिनेश कार्तिकने हस्तक्षेप केला असला, तरी त्याने सामन्यानंतर केलेल्या वक्तव्यामुळे बराच गोंधळ उडाला. कार्तिक म्हणाला की ओएन मॉर्गनला अश्विनची अतिरिक्त धाव आवडली नाही. कारण, तशी धाव घेणे हे खेळ भावनेच्या विरोधात होते. कार्तिकच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला. अश्विनने नंतर जे केले ते नियमानुसार केल्याचे म्हणत काही ट्विट्स केले. पण हे चिघळण्यामागे कार्तिकच असल्याचे म्हणत सेहवाग त्याला दोष देत आहे.
एका वाहिनीवर संभाषणात सेहवाग म्हणाला, मी या संपूर्ण प्रकरणात दिनेश कार्तिकला सर्वात मोठा दोषी मानतो. जर मॉर्गन काय बोलला याबद्दल कार्तिक बोलला नसता, तर इतका गदारोळ झाला नसता. जर त्याने असे म्हटले असते की फार काही घडले नाही, फक्त साधा वाद होता तो आणि हे सामन्यात होत राहते, तर इतका गोंधळ झाला नसता.
रविचंद्रन अश्विननेही ओएन मॉर्गनच्या वक्तव्याबद्दल ट्विट करून आपली बाजू मांडली. रविचंद्रन अश्विनने एका पाठोपाठ एक ट्विट केले, मैदानावर काय घडले आणि ते बरोबर की अयोग्य? असे प्रश्नही त्याने उपस्थित केले.
महत्त्वाच्या बातम्या –
AUSW vs INDW: दुसऱ्या दिवशीही पावासाचा व्यत्यय, पण मंधनाच्या शतकामुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत






