टी२० विश्वचषक २०२१ मध्ये इंग्लंड संघाने कर्णधार ओएन मॉर्गनच्या नेतृत्वात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. इंग्लंडने विश्वचषकातील त्याच्या पहिल्या चारही सामन्यात सलग विजय मिळवला आहे आणि त्यांचे नेटरनरेट देखील अप्रतिम आहे. या प्रदर्शनाच्या जोरावर संघाने स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातील त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे. अशात कर्णधार ओएन मॉर्गनचे सर्वत्र कौतुक केले जात असून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनेही त्याचे कौतुक केले आहे.
कार्तिकने मॉर्गनची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली आहे. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक आणि मॉर्गन हे दोन्ही खेळाडू कोलकाता नाइट रायडर्स या संघासाठी खेळतात आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. यापूर्वी कार्तिक कोलकाता संघाचा कर्णधार असताना मॉर्गन त्याच्या नेतृत्वात खेळला आहे, तर आता कार्तिक मॉर्गनच्या नेतृत्वात खेळतो.
इंग्लडने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषकातील सलग चौथा विजय मिळवल्यानंतर कार्तिकने धोनी आणि मॉर्गनची तुलना केली आहे. विश्वचषकात सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंडने श्रीलंकेवर २६ धावांनी विजय मिळवला. भारतासाठी ज्याप्रकारे धोनी आहे, तसाच इंग्लंडसाठी मार्गन असल्याच्या, कार्तिकने म्हटले आहे. तसेच टी-२० विश्वचषकात इंग्लंडला पराभूत करणे कठीण असल्याचेही कार्तिकने म्हटले आहे.
इंग्लंडच्या विजयानंतर कार्तिकने एक ट्वीटर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये कार्तिकने इंग्लंडला टी-२० विश्वचषक जिंकू शकणाऱ्या संघाचा करार दिला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “जसा भारतासाठी एमएस धोनी आहे, तसाच इंग्लंडसाठी ओएन मॉर्गन आहे. ओएन मॉर्गनने अप्रतिम नेतृत्व केले. काल देखील अप्रतिम. इंग्लंड सध्या टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ आहे.”
M S DHONI is to India what EOIN MORGAN is to England
Well led @Eoin16 . Brilliant yesterday . The team to beat this World T20 is @ECB_cricket #WorldT20 #CricketTwitter
— DK (@DineshKarthik) November 2, 2021
दरम्यान, इंग्लंड आणि श्रीलंकेदरम्यान सोमवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आनंत्रित केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये चार विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या. यामध्ये यष्टीरक्षक जॉस बटलरने १०१ धावांचे महत्वाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ १९ षटकांमध्ये १३७ धावांवर सर्वबाद झाला आणि इंग्लंडने सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडविरुद्ध उतरणार भारताची ‘यंग ब्रिगेड’; ऋतुराजसह हे खेळाडू असणार संघाचा भाग
संपूर्ण वर्षात बाबर-रिझवानचा धूमाकूळ; शतकी भागीदारीसह बनविला विश्वविक्रम
“मी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देतो, आता आपल्यावर भारतीय खेळाडूंची काळजी घेण्याची वेळ आहे”