---Advertisement---

भारतीय संघ पाचव्या कसोटीत मैदानात का उतरला नाही? दिनेश कार्तिकने सांगितले खरे कारण

Team-India
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्याच्या अखेरीस कोरोनामुळे भारतीय शिबिरात गोंधळ उडल्यानंतर झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही बोर्डांमधील प्रदीर्घ चर्चेनंतर मालिकेतील शेवटची आणि पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, भारतीय खेळाडूंच्या माघारीमागील काय कारण होते, याबद्दल दिनेश कार्तिकने प्रकाश टाकला आहे.

पाचवा कसोटी सामना सुरु करण्याआधी खेळाडूंची कोरोना चाचणी झाली होती. सर्व खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, पण असे असतानाही खेळाडूंनी मँचेस्टर कसोटीमधून माघार घेतली. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने या प्रकरणाबद्दल मत मांडचाना म्हटले की सहायक फिजिओ योगेश परमार कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व खेळाडूंमध्ये भीती पसरली आणि यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

कार्तिक म्हणाला, ‘मी काही भारतीय खेळाडूशी बोललो. मालिकेतील सर्व सामने जवळजवळ शेवटच्या दिवसापर्यंत खेळले गेले, सर्व खेळाडू थकले आहेत आणि संघात फक्त एक फिजिओ आहे. त्यांच्याकडे दोन फिजिओ होते, परंतु मुख्य प्रशिक्षक आणि इतर दोन प्रशिक्षकांना कोविड -१९ मुळे विलगिकरणात ठेवण्यात आले आहे.’

‘त्यांच्याकडे एकच फिजिओ होता, ज्याला आता कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही एक मोठी समस्या आहे. जर त्याऐवजी दुसरे कोणी असते, किंवा तुम्हाला इतर मदतीची आवश्यकता असती तर ते इतके भीतीदायक ठरले नसते. परंतु जेव्हा संघाचा फिजिओ या कोविडमध्ये अडकला, तेव्हा मला वाटते की तो थोडा चिंतेचा विषय होऊ लागला.’

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज पुढे म्हणाला की कनिष्ठ फिजिओची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खेळाडूंना मानसिकदृष्ट्या कठीण काळाला सामोरे जावे लागले आणि वेळापत्रकानुसार सामना खेळवण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता.

कार्तिक पुढे म्हणाला, ‘या व्यतिरिक्त, तुम्हाला हे देखील समजून घ्यावे लागेल की जर सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवशी प्लेइंग इलेव्हनच्या खेळाडूची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असती, तर त्याचे काय झाले असते. त्याने इतर खेळाडूंनाही संक्रमित केलेच असते ना?’

या सर्व पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये काय होईल हे पाहणे महत्त्वाचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आम्हाला वेगळे टाकू नका, धार्मिक वातावरणाची शिक्षा देऊ नका’, अफगाणिस्तान क्रिकेटच्या सीईओ यांची विनंती

‘निर्णायक क्षणी भारतीय संघाने चांगली कामगिरी केली’, अँडरसनने विराटसेनेवर उधळली स्तुतीसुमने

आपल्या खेळाडूंना मँचेस्टरवरुन युएईला आणण्याच्या तयारीत चेन्नई सुपर किंग्स, सीईओने दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---