भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मागील वर्षी टी20 विश्वचषक संघात समावेश असतानाही त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. यावर्षी झालेल्या विश्वचषकात त्याची संघात निवड झाली नव्हती. त्यानंतर त्याने आता भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याचवेळी, पुढील वर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात शार्दुल भारतीय संघाचा भाग असावा, असे मत शार्दुलचे बालपणीचे प्रशिक्षक व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांनी केले आहे.
शार्दुल भारतीय संघासाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे याबाबत बोलताना दिनेश लाड यांनी माहिती दिली. तसेच, आगामी वनडे विश्वचषकात आपण त्याला भारतीय संघात पाहत असल्याचे देखील म्हटले. ते म्हणाले,
“मी नक्कीच त्याला पुढील वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघासाठी खेळताना पाहतोय. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तो फलंदाजीतही चांगले योगदान देऊ शकतो. आपण आत्ता पाहतो की हार्दिक बाद झाल्यानंतर भारताचे इतर फलंदाज तितकेसे चांगली फलंदाजी करत नाही. फलंदाजी अष्टपैलू म्हणून तो संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. 2023 विश्वचषकाआधी त्याला पुरेपूर संधी द्यायला हवी.”
शार्दुलने आपल्या कारकिर्दीत विदेशात नेहमीच उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. मध्यमगती गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी तो बळी देखील मिळवताना दिसतो. आयपीएलच्या पुढील हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना दिसेल.
दुसरीकडे दिनेश लाड यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांना नुकताच केंद्र सरकारचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व शार्दुल ठाकूर हे त्यांचे दोन शिष्य सध्या भारतीय संघात खेळतात. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या तब्बल 185 खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळलेली आहे.
(Dinesh Lad Wants Shardul Thakur Will Play In 2023 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरेरे! भारताने सामना गमावताच ट्विटरवर तिखट प्रतिक्रिया, नेटकरी म्हणाले, ‘हा भारत विराट आणि बुमराहशिवाय…’
आता सुट्टी नाही! उमरान मलिकने वनडेतील पहिल्या चेंडूपासून सुरू केली दहशद, वेगातील सातत्य मन जिंकणारे