भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने २० षटकात ६ गडी बाद १६४ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट्सच्या नुकसानावर न्यूझीलंडचे लक्ष्य पूर्ण करत सामना खिशात घातला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
न्यूझीलंड संघाकडून मार्टिन गप्टिलने ७० आणि मार्क चॅपमन ६३ धावा केल्या आणि दोघांनी १०९ धावांची भागीदारी केली. सामन्यादरम्यान मार्टिन गप्टिलने आणि दीपक चहर यांच्यात एक मोठा रोमांचक किस्सा घडला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
कर्णधार रोहित शर्माने सामन्यातील अठरावे षटक टाकण्यासाठी दीपक चहरला पाचारण केले. दीपकच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिलने सणसणीत षटकार ठोकला. हा फटका खेळतांना त्याची नजर शेवटपर्यंत दीपक चहरवर खिळून होती. दिपकने त्याला त्यावेळी उत्तर न देता मागे फिरणे पसंत केले.
त्याच्या पुढच्याच चेंडूवर गप्टिलने अजून एक जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण हवेत उडालेला त्याचा चेंडू श्रेयस अय्यरने झेलला. गप्टिल बाद होताच तो दीपक चहर त्याच्याकडे रोखून पाहत राहिला. त्याने मार्टिन गप्टिलला जशास तसे उत्तर देऊन, प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. या घटनेचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.
https://www.instagram.com/tv/CWYdWAyB7gu/?utm_source=ig_web_button_share_sheet
तत्पूर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले होते. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६४ धावा केल्या आणि भारताला विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गप्टिलने सर्वाधिक ७० धावा केल्या तर मार्क चॅपमनने ६३ धावांचे योगदान दिले. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात भारताकडून रोहित शर्माने कर्णधार खेळी केली. त्याने ३६ चेंडूत ४८ धावा फटकावल्या. तसेच सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६२ धावा करत संघाच्या विजयात बहुमुल्य योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
एकवेळी ४ वर्षे टी२० संघातून बाहेर राहिलेल्या अश्विनचे न्यूझीलंडविरुद्ध विशेष ‘अर्धशतक’
बटलरला भोवली पंतची निर्भीड फलंदाजी; म्हणाला, ‘मीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशीच दाणादण उडवेन’