न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा (ICC Women World Cup 2022) थरार सुरू आहे. शनिवारी (१२ मार्च) हॅमिल्टन येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात विश्वचषकातील दहावा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १५५ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी अत्यंत शानदार प्रदर्शन केले. वेस्ट इंडीजची फलंदाज चेडियन नेशनला हिला बाद करताना भारतीय क्षेत्ररक्षकांनी चपळाई दाखवली.
वेस्ट इंडिजच्या डावात चेडियन नेशन अत्यंत हास्यास्पद पद्धतीने बाद झाली. नेशनला धाव पूर्ण करायला खूप वेळ होता. परंतु, खेळपट्टीवर धाव घेत असताना ती खूपच सुस्त दिसली. या संधीचा फायदा घेत भारतीय क्षेत्ररक्षकाने तिला थेट फेकीने धावबाद केले.
https://www.instagram.com/reel/Ca_xTGZFUy-/?utm_medium=copy_link
वेस्ट इंडीजच्या डावाच्या ३७ व्या षटकात स्नेह राणाच्या चेंडूवर सेलमनने फाइन लेगच्या दिशेने फटका खेळून दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांनी पहिली धाव सहजतेने पूर्ण केली. पण दुसऱ्या धावेदरम्यान नेशन नॉन स्ट्राइकच्या दिशेने अतिशय आळशीपणे मागे वळून पाहत धावत होती. भारतीय क्षेत्ररक्षक मेघनाने फाइन लेगवर उभ्या असलेल्या दीप्तीकडे चेंडू टाकला. दीप्तीने एकही संधी न गमावता नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने थेट फेक करून नेशनला धावबाद केले.
भारतीय संघाचा दणदणीत विजय
विश्वचषकातील आपला तिसरा सामना खेळत असलेल्या भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्मृती मंधाना व हरमनप्रीत कौर यांच्या शतकांच्या जोरावर ३१७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ केवळ १६२ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघासाठी स्नेह राणाने सर्वाधिक ३ बळी मिळवले. वेस्ट इंडीजवरील या १५५ धावांच्या दणदणीत विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय (mahasports.in)