चेंडू छेडछाड प्रकरणी दोषी आढळलेला आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने गुरुवारी, 28 जूनला ग्लोबल टी20 कॅनडा लीगमधून शानदार पुनरागमन केले.
त्याने या लीगमध्ये टोरंटो नॅशनल संघाकडून खेळताना वॅनकूवर नाईट्स विरुद्ध 41 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार मारला.
या सामन्यानंतर स्मिथ पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘मला नेहमी सारखा आनंद वाटत नाही, पण जेव्हा चांगले वाटत नाही तेव्हा धावा करणे छान आहे’
पुढे स्मिथ म्हणाला, “जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा सगळं काही धूसर झाले. मी फक्त जे करत आहे त्याकडे लक्ष केंद्रित केले. माझ्यासाठी हे जवळजवळ हे आश्रय होते.”
“मी खोटे बोलणार नाही. माझ्यासाठी हा आयुष्यातील कठीण काळ आहे. पण मी झालेली शिक्षा स्विकारली आहे. मला ज्या गोष्टीतून जायचे आहे ते स्विकारले आहे आणि मला यातून पुढे जायचे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी माझ्यासाठी क्रिकेट खेळणे हाच मार्ग आहे आणि हेच करायला मला आवडते.”
प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल स्मिथ म्हणाला, “प्रेक्षकांनी दिलेला पाठिंबा ऐकूण चांगले वाटते. तूम्हाला पाठिंबा मिळणे चांगले असते. त्यामुळे मी इथे आल्यापासून पाठिंबा दिलेल्या सर्वांचा आभारी आहे.”
मार्च महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळल्याने स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटसाठी 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
मात्र स्मिथ आणि वार्नरला क्लब क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पहिल्यांदाचा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी स्मिथ मैदानात उतरला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–शिखर धवन मोडणार हिटमॅन रोहितचा ‘गब्बर’ विक्रम
–टॉप- ५: जगातील हे दिग्गज क्रिकेटपटू चष्मा घालून खेळायचे क्रिकेट!
–आठवतंय का? आजच्याच दिवशी ११ वर्षींपुर्वी सचिनने केलेला भीमपराक्रम