आयपीएल २०२२ (IPL 2022 MEGA AUCTION) च्या मेगा लिलावादरम्यान स्टार स्पोर्ट्सच्या दोन न्यूज अँकर चांगल्याच चर्चेत होत्या. दिशा ओबेरॉय(DIsha oberoi) आणि भावना बालकृष्णन अशी या दोन अँकरची नावे आहेत. या लेखात आपण या दोंघीबद्दल जाणून घेऊयात…
दिशा ही दिल्लीची रहिवासी असून ती पूर्वी रेडिओमध्ये काम करत होती आणि आता तिने अँकरिंगच्या जगात प्रवेश केला आहे. तर भावना आधी समालोचक होती आणि आता अँकर बनली आहे. दिशाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात रोडियो जॉकी म्हणून केली. तीने एफएम ९३.५ साठी काम केले आहे. रेडिओ जॉकी म्हणून ठसा उमटवल्यानंतर तीने अँकरिंगला सुरुवात केली.
दिशाने आता अँकर म्हणून स्वत:ची मोठी ओळख निर्माण केली आहे. विशेषत: आयपीएल मेगा लिलावाचा भाग बनल्यानंतर खुप लोक तिला ओळखू लागले आहेत. २०२० मध्ये दिशाला नॅशनल मीडिया अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे. तिला रेडिओमधील चांगल्या कामासाठी कर्नाटक वुमेन्स अचिव्हर्स अवॉर्डही देण्यात आला होता.
https://www.instagram.com/p/CWTP6YBvUem/?utm_source=ig_web_copy_link
३६ वर्षीय भावना बालकृष्णन ही चेन्नईच्या रहिवासी आहे. समालोचक म्हणून शानदार कामगिरी केल्यानंतर तीने अँकरिंगच्या जगात प्रवेश केला. भावना विवाहित असून तिचे पती निखिल रमेश हे आहेत. भावना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे साडे सहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तीला भरतनाट्यम नृत्यही करता येते.
व्हीजे भावना या नावाने भावनाची सर्वात जास्त ओळख आहे. भावनाची ओळख भारतातील सर्वात लोकप्रिय क्रीडा पत्रकारांपैकी एक म्हणून सुद्धा आहे. टीव्हीवर अँकरिंगसोबतच ती क्रिकेटमध्ये समालोचक आणि व्हिडिओ जॉकी म्हणूनही काम करत असते. ती अगोदर गायिका आणि नृत्य देखील करत होती. महिला क्रीडा पत्रकारांमध्ये मयंती लँगरनंतर व्हीजे भावना ही सर्वात लोकप्रिय पत्रकार आहे.
https://www.instagram.com/p/CZ4tut2BK_2/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान रविवारी( १३ फेब्रुवारी) आयपीएल लिलावाचा दुसऱ्या दिवशी १० फ्रॅंचायझी उरलेल्या खेळाडूंवर बोली लावणार आहेत. या दिवशी कोणत्या खेळाडूंवर बोली लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction: राजस्थानचा भिडू झाला ‘दिल्लीकर’; युवा चेतन साकारीयाला लागली इतक्या कोटींची बोली
नवदीप सैनीची ‘रॉयल्स’मध्ये एन्ट्री, केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
‘भारताचा बिलिनियर’ जयदेव उनाडकट यंदा मुंबईच्या ताफ्यात दाखल, पण किंमत मात्र घसरली