क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणाचे अधिकार यावरून मीडिया अधिकारांसाठी नेहमीच स्पर्धा दिसली आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाच्या पुरूष आणि महिला संघांच्या सामन्यांचे प्रक्षेपण भारतात डिज्नी-स्टारवर होणार आहे. ही घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीटरवर केली आहे. त्यामध्ये डिज्नी-स्टार भारतासोबतच इतर आशियाई देशांमध्येही ऑस्ट्रेलियात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे थेट प्रसारण करणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) बोर्डला या बातमीचा आनंद झाला असून त्यांनी म्हटले, “ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या धमाकेदार क्रिकेटचे सामन्याचे थेट प्रक्षेपण आशिया खंडात दाखवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
We are delighted to announce a new association with Disney Star to broadcast Australian cricket throughout India and other territories across Asia! pic.twitter.com/LcdklSrU3T
— Cricket Australia (@CricketAus) July 24, 2022
सध्याच्या वेळेला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे आहे. अशातच पुढच्या वर्षी होणाऱ्या सामन्यांचे प्रसारण डिज्नी-स्टार (Disney Star) करणार आहे. डिज्नी स्टार आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये ७ वर्षाचा करार झाला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या पुरूष, महिला यांच्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबतच महिला पुरूषांच्या बिग बॅश लीगचे (बीबीएल) सामनेही दाखवले जाणार आहेत.
डिज्नी स्टारने नुकतेच आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) थेट प्रक्षेपणाचे हक्क विकत घेतले आहेत. यामुळे येत्या काळात भारतातील स्टारच्या दर्शकांसाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे.
या कराराबात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निक हॉकले म्हणाले, “आम्ही डिज्नीसोबत केलेल्या हंगाम २०२३-२४पासूनचा करार करून खूश आहोत. भारतात डिज्नी स्टार हा खेळांसाठी मोठा आणि महत्वाचा पर्याय राहणार. यामुळे भारतीय आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेटसबंध आणखी सुधारेल. तसेच प्रेक्षकांना राष्ट्रीय आणि टी२० लीगचे सामनेही पाहायला मिळणार आहेत.”
बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) तीन दिवस आयोजित केलेल्या आयपीएल ई-लिलाव ४८,३९० कोटी रुपयांना विकला गेला. त्याचबरोबर या भक्कम कमाईच्या शर्यतीत आयपीएल ही जगातील दुसरी महागडी स्पर्धा ठरली आहे. आयपीएल २०२३-२०२७ चे भारतातील टीव्ही प्रसारण हक्क डिज्नी-स्टार (Disney Star) याने मिळवले तर भारतीय उपमहाव्दिपाचे डिजिटल प्रसारण हक्क वायकॉम १८ ने मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पॉंटिंग म्हणतोय, “त्याला पाहून मला सायमंड्स आठवतो”
टी२० गाजवणाऱ्या आवेशला मिळाली एकदिवसीय पदार्पणाची संधी, पाहा कशी राहिली आजवरची कारकिर्द