---Advertisement---

कर्णधार कोहलीच्या या कृतीमुळे चाहते नाराज, ट्विटरवरुन सुनावले खडेबोल

---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच त्याच्या फलंदाजीतील अफलातून कामगिरीमुळे चर्चेत असतो. तसेच त्याचे अशा कामगिरीमुळे त्याने नेहमी कौतुक होत असते. मात्र यावेळी त्याला एका कृतीमुळे चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

झाले असे की भारताचा आॅस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु आहे. गुरुवारी(29 नोव्हेंबर) या सामन्याच्या नाणेफेकीवेळी विराट टी-शर्ट आणि शॉट पॅन्ट घालून आला होता. तर आॅस्ट्रेलिया एकादश संघाचा कर्णधार सॅम व्हाईटमन मात्र संघाच्या पूर्ण ड्रेसमध्ये आला होता.

विराटच्या या कृतीमुळे क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी त्याच्यावर कडक शब्दात टीकाही केली आहे. चाहत्यांनी म्हटले आहे की क्रिकेटची ही संस्कृती नाही. मात्र त्याचबरोबर काही चाहत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

https://twitter.com/Prakash1049/status/1067910745575157761

https://twitter.com/appy10_/status/1067913187809472512

https://twitter.com/adu08/status/1068155889201274882

हा सामना बुधवारी (28 नोव्हेंबर) सुरु होणार होता. परंतू पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गुरुवारी या सामन्याला सुरुवात झाली.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 358 धावा केल्या आहेत. या डावात  पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतके केली आहेत.

तर आॅस्ट्रेलिया एकादश संघाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 बाद 356 धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीने घेतल्या आहेत. त्याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादव आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.

त्याचबरोबर या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना युवा भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अॅडलेड येथील पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: रशीद खानच्या धोनी स्टाईलने विरेंद्र सेहवाग झाला अचंबित

मैदानावरुन पृथ्वी शाॅला अक्षरश: उचलुन ड्रेसिंग रुममध्ये नेले

हॉकी विश्वचषक २०१८: आज चीन समोर असणार बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आर्यलॅंड सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment