पुणे – पुणे जिल्हा फुटबॉल संघाने मुलींच्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत दमदार सलामी दिली. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात हिंगोलीचा ८-० असा धुव्वा उडवला.
नाशिक येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी पुणे संघांच्या विजयात पूजा गुप्ता हिची कामगिरी महत्वाची ठरली. तिने शानदार हॅटट्रिक साजरी केली. तनया गायकवाड हिने दोन गोल करून तिला सुरेख साथ केला. पियुषा नरके, रोशन पंडित आणि संजना गुप्ता यांनी एकेक गोल करून पुण्याचा मोठा विजय साकारण्यात आपली भूमिका बजावली.
पुण्याच्या मुलींचा दणका इतका जबरदस्त होता की त्यांनी विश्रांतीलाच ८-० अशी आघाडी मिळविली. त्यांच्या या धडाक्याची हिंगोलीने इतकी धास्ती घेतली की त्यांनी मध्यंतरानंतर सामनाच सोडून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA: आयपीएलदरम्यान होणार बैठक, रोहितच्या अनुपस्थितीत ‘हा’ खेळाडू बनू शकतो टीम इंडियाचा कर्णधार
आयपीएल मॅच फिक्सिंगच्या आरोपात सीबीआयकडून तिघांना अटक, पाकिस्तानशी आहे कनेक्शन!
निवृत्तीनंतर यूटर्न घेणारा रायुडू पहिलाच नव्हे, ‘या’ ५ क्रिकेटर्सनीही निर्णय बदलत केले होते पुनरागमन