ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने रामकृष्ण म्हात्रे क्रीडा मंडल काल्हेर संयोजित शिवसेना शाखा काल्हेर आयोजित जिल्हास्तरीय सरपंच चषक कबड्डी स्पर्धाचा आयोजन करण्यात आले आहे.
मंडळातर्फे दिनांक. २३ जानेवारी ते २६ जानेवारी याकालवधीत ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष ‘अ’ आणि ‘ब’ गट व महिला गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत पुरुष ‘अ’ गटाचे २७ संघ, पुरुष ‘ब’ गटाचे ६८ संघ तर महिला गटाचे १८ संघ सहभागी होणार आहेत.
पुरुष ‘अ’ गटांच्या विजेत्या संघाला रोख रक्कम २५,००० रुपये व सरपंच चषक, उपविजेते संघाला १५,००० रुपये व चषक, उपांत्य उपविजेते संघास ३,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल. पुरुष ‘ब’ गटांच्या विजेत्या संघाला रोख रक्कम १५,००० रुपये व सरपंच चषक, उपविजेते संघाला ७,००० रुपये व चषक, उपांत्य उपविजेते संघास २,००० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल. महिला गटांच्या विजेत्या संघाला रोख रक्कम ७,००० रुपये व सरपंच चषक, उपविजेते संघाला ३,००० रुपये व चषक, उपांत्य उपविजेते संघास १५०० रुपये व चषक देऊन गौरविण्यात येईल
सर्व गटातील मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, व दिवसातील उत्कृष्ट खेळाडूला बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. राजे छत्रपती शिवाजी क्रीडांगण, काल्हेर-भिवंडी याठिकाणी प्रकाशझोतात होणार आहेत.